HW News Marathi
देश / विदेश

#MahatmaGandhi : जाणून घ्या… महात्मा गांधींविषयी दुर्मिळ माहिती

संपूर्ण जगाला अहिंसा आणि शांतीचा संदेश देणारे राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी झाला. महात्मा गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते होते. महात्मा गांधींच्या अहिंसेच्या मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना ‘महात्मा’ ही उपाधी दिली. ३० जानेवारी १९४८ रोजी पुरोगामी हिंदू नेता नथुराम गोडसेने महात्मा गांधींची गोळ्या झाडून हत्या केली.

१) सुरुवातीच्या काळात इंग्रजांवर विश्वास बाळगून होते

महात्मा गांधी हे १९१८ सालापर्यंत इंग्रज सरकारवर विश्वास ठेवून आणि अपेक्षा बाळगून होते. मात्र १९१९ साली झालेल्या जालियनवाला बाग येथील भीषण हत्याकांडानंतर गांधीजींचा इंग्रजांवरचा विश्वास संपूर्णपणे उडाला.

२) नोबेल पुरस्कारासाठी मिळाले ५ वेळा नामांकन

स्वातंत्र्य चळवळीत अहिंसक मार्गांना प्रोत्साहन देणाऱ्या महात्मा गांधी यांना नोबेल शांततेसाठी पाच वेळा नामांकित केले गेले होते. गांधीजी हे नोबेल शांतता पुरस्कारांसाठी सर्वात आदर्श उमेदवारांपैकी एक होते. तरीही अनेक कारणास्तव गांधीजींना कधीही बक्षीस जिंकता आले नाही. १९३७, १९३८, १९३९, १९४७ आणि शेवटी १९४८ या पाच वर्षांत महात्मा गांधीजी यांना नोबेल पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले होते.

३) गांधीजी यांचे हिटलरसह पत्रव्यवहार होते

गांधीजी यांचे टॉलस्टॉय, आईन्स्टाईन आणि हिटलर यांच्याशी पत्रव्यवहार होते. खरंतर हिटलर आणि गांधीजी ही धोरण आणि विचारांच्या बाबतीत दोन टोकंच ! शांततेचा आग्रह धरत लिहिलेल्या पत्रात गांधीजी हिटलरला म्हणतात, “तुमच्या शौर्य आणि देशभक्तीबद्दल आमच्या मनात जराही शंका नाही. तुमच्या शत्रूंच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही राक्षस आहात असेही आम्हाला वाटत नाही. परंतु, तुमचं लिखाण, तुमचे मित्र आणि समर्थक ह्यांचा व्यवहार निश्चितच राक्षसी वाटतं. विशेषतः माझ्यासारख्या विश्व बंधुत्वाच्या समर्थकाला.”

४) संपूर्ण पृथ्वीला २ प्रदक्षिणा

महात्मा गांधी हे आपल्या संपूर्ण जीवनातील ४० वर्ष, दर दिवशी १८ किलोमीटर चालायचे. १९१३ ते १९३८ या कालखंडात ते ७९००० किमी अंतर पायी चालले. हे अंतर म्हणजे आपल्या पृथ्वीच्या २ प्रदक्षिणा पूर्ण केल्यासारखे आहे.

५) TIME Person Of The Year

TIME मासिकाच्या मुखपृष्ठावर १९३० साली TIME Person Of The Year म्हणून महात्मा गांधीजी यांची प्रतिमा होती. महात्मा गांधीजी हे असे एकमेव भारतीय आहेत ज्यांना TIME Person Of The Year ने सन्मानित करण्यात आले आहे.

६) हत्येच्या एक दिवसआधी काँग्रेस बरखास्त करण्याचा विचार

३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधीजी यांची हत्या करण्यात आली होती. गांधीजींच्या हत्येच्या केवळ एक दिवस आधी गांधीजी काँग्रेस पक्ष बरखास्त करण्याचा गांभीर्याने विचार करीत होते.

७) स्टिव्ह जॉब्स गांधीजींचे मोठे चाहते, आठवण म्हणून वापराचे गांधीजींसारखाच चष्मा

Apple चे निर्माते असलेले स्टिव्ह जॉब्स हे महात्मा गांधीजी यांचे खूप मोठे चाहते होते. गांधीजी यांची आठवण आणि अभिवादन म्हणून ते गांधीजींसारखाच चष्मा वापरायचे.

८) भारतासह परदेशातही इतके ‘महात्मा गांधी रोड’

भारतासह परदेशांतही महात्मा गांधीजींच्या नावाने अनेक लहान मोठे रस्ते आहेत. भारतात ‘महात्मा गांधी रोड’ नावाने तब्बल ५३ मोठे रस्ते आणि परदेशांत ४८ रस्ते आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“हम जीत नहीं रहे तो…”, काँग्रेसच्या अलका लांबांनी निकालाआधीच मानली हार

swarit

आज येणार आरुषी-हेमराज हत्याकांडाचा निकाल

News Desk

तिथे मॅप बदलले जात आहेत, आणि आपण इथे ॲप वर बंदी घालतोय

News Desk