HW News Marathi
देश / विदेश

साबरमती आश्रमाला भेट देऊन ट्रम्प यांना गांधीजींच्या नावाचा विसर पडला

अहमदाबाद | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या कुटुंबीयांसमेत आज भारतात दाखल झाले. ट्रम्प यांच्या स्वागतासाठी मोदी स्वत: सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर गेले होते. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प, ट्रम् मुलगी इवांका आणि जावई जेरेड कुशनर यांचे मोठ्या आदराने स्वागत करण्यात आले.

मोदींच्या भाषणातून ट्रम्प यांच्या नावाचा वारंवार उल्लेख झाला

मोटेरा स्टेडीयममध्ये ट्रम्प यांचे आगमन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोटेरा स्टेडियममध्ये अमेरिकेचे 25राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वागत केलं, यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत-अमेरिकेच्या मैत्रीच्या घोषणा दिल्या आणि नमस्ते ट्रम्प असं म्हणाले. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं पूर्ण कुटुंब अहमदाबादेत आलं असून, साबरमती आश्रमालाही भेट दिली आहे. ही जमीन गुजरातची असून, आज पूर्ण भारताचं चित्र इथून दिसत आहे. आज अमेरिका आणि भारताच्या नात्यानं नवी उंची गाठली आहे.

भारताने केलेले हे स्वागत कायम अमेरीकन नागरिकांच्या मनात राहील…

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी लोकांशी संवाद साधला. भारताने आमचे जे स्वागत केले आहे, जे आदरातिथ्य केले आहे ते अमेरीकन नागरिकांच्या मनात कायम राहील, अशा शब्दांत ट्रम्प यांनी भारताचे आणि मोदींचे आभार मानले.

साबरमती आश्रम भेट

डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्नी मेलेनिया ट्रम्प यांच्या सोबत महात्मा गांधींच्या साबरमती आश्रमाला भेट दिली. यावेळी त्यांनी चरखा चालवण्याचा आनंदही लूटला. यानंतर ट्रम्प यांनी साबरमती आश्रमाच्या व्हिजिटर्स बुकमध्ये आपली प्रतिक्रियाही नोंदवली. माझे महान मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे या शानदार दौऱ्यासाठी आभार असं त्यांनी या बुकमध्ये लिहिले आहे. पण ज्या महान व्यक्तीच्या आश्रमाला डोनाल्ड ट्रम्प यांनी भेट दिली त्या महात्मा गांधीजींचा उल्लेख मात्र करण्यास ते विसरले आणि मोदींचेच गुणगान ते गात होते.

आश्रमाच्या भेटीनंतर ट्रम्प आग्रा येथे रवाना झाले. आणि जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहाल येथे भेट देत रम्य संध्याकाळ त्यांनी घालवली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कृषि कायद्याविरोधात शेतकऱ्यांची ६ फेब्रुवारीला भारत बंदची हाक!

News Desk

पाकिस्तानकडून बेछूट गोळीबार, जवान शहीद

Gauri Tilekar

नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचा राजीनामा

News Desk