HW News Marathi
देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

महाराष्ट्राच्या सत्तांतरावर 21 ते 23 तारखेपर्यंत घटनापीठासमोर सुनावणीची शक्यता

मुंबई | महाराष्ट्राच्या सत्तांतरावर सलग तीन दिवस सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात 21 ते 23 फेब्रुवारीपर्यंत पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला शुक्रवारी (15 फेब्रुवारी) केंद्रीय निवडणूक आयोगाने देण्याचा निर्णय दिला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगांच्या निर्णयामुळे देशाच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली. यामुळे 21 ते 23 तारखेपर्यंत होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीदरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालावर (Election Commission of India) ठाकरे गट आक्षेप घेण्याची शक्य होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्या आठवड्यापूर्वी सलग तीन दिवस सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सत्तांतर प्रकरणाची सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट केले होते. या तीन दिवसांच्या सुनावणीदरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालावर ठाकरे गट आक्षेप घेऊन युक्तीवाद करण्याची शक्यता आहे. या सुनावणीवेळी होण्याची शक्यता वर्तवली जाते.

“शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळविण्यासाठी 2 हजार कोटी रुपयांचा सौदा झाला आहे”,  असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णयावर केले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या  निर्णयानंतर ठाकरे गटाकडून शिंदे गटावर आरोपाच्या फैरी सुरूच आहेत.  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (18 फेब्रुवारी) कारमधून मातोश्री बाहेरील कार्यकर्त्यांना संबोधित केले.

 

Related posts

“आता कळले ठाकरे सरकारमधील काही मंत्री…”, नितेश राणेंचा ठाकरे सरकारवर निशाणा

News Desk

…म्हणून सोलापूरात विरोधकांच्या संघर्ष यात्रेकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

News Desk

कार्तिकी एकादशीनिमित्ताने उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची महापुजा संपन्न

Aprna