HW News Marathi
देश / विदेश

आसाममधील डबलडेकर पुलाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उदघाटन

नवी दिल्ली | आसामच्या डिब्रुगढ येथे आज (२५ डिसेंबर) दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील सर्वात जास्त लांबीच्या बोगीबील पुलाचे उदघाटन करण्यात आले आहे. या पुलाची लांबी ४.९४ किलोमीटर एवढी आहे. हा पूल आसाम आणि अरुणाचल प्रदेशला जोडणार असून या पुलामुळे डिब्रुगढपासून अरुणाचल प्रदेशच्या धेमाजीपर्यंतचे अंतर तब्बल ७०० किमीने घटणार असून १८० किमी एवढे होणार आहे. या पुलाचे आणखी एक महत्त्व म्हणजे यामुळे चीन सीमेपर्यंतचा मार्ग सोपा झाला आहे.

बोगीबील पुलाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हा पूल डबलडेकर पूल आहे. या पुलावर ट्रेन आणि बस या दोघांचीही वाहतूक होऊ शकणार आहे. या पुलासाठी जवळपास ४८५७ कोटी इतका खर्च करण्यात आला आहे. नॉर्थईस्ट फ्रंटियर रेल्वेचे सीपीआर प्रणव ज्योती शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, “ब्रम्हपुत्र नदीवर पूल बांधणे हे मोठे कठीण काम होते. या भागात पाऊस मोठ्या प्रमाणात होते. त्याचप्रमाणे हे भूकंपप्रवण क्षेत्र असल्याने येथे भूकंपाचा देखील धोका अधिक आहे.”

माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी १९९७ रोजी या प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते. यानंतर २००२ रोजी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात या पुलाचे काम सुरु करण्यात आले होते. तर आज अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या बोगीबील पुलाचे लोकार्पण करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकासआघाडीच्या मंत्रिमंडळाची बैठक; कोरोना आणि राज्यसभासंदर्भात होणार चर्चा

Aprna

इंडोनेशियात ४.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

News Desk

‘केवळ गांधी द्वेषातूनच ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराच्या नावात बदल!’ नाना पटोले

News Desk