श्रीनगर | पुलवामा हल्ल्यानंतर जगभरातून पाकिस्तानचा विरोध होत असून देखील पाकच्या कुरापती थांबण्यचे नाव नाही. जम्मू-काश्मीरमधील कुलमाग जिल्ह्यातील तुरीगाम येथे आज (२४ फेब्रुवारी) दहशतवादी आणि सुरक्षा दल यांच्यात चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान पोलीस उपअधीक्षक अमन ठाकूर शहीद झाले आहेत तर तीन जवान जखमी झाले आहेत. जखमी जवांनांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
#JammuAndKashmir: Encounter underway between security forces and terrorists in Tarigam, Kulgam. DSP Aman Thakur lost his life in the encounter. 3 Army personnel are injured. Encounter is in progress. (#Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/UQ5tPprk2b
— ANI (@ANI) February 24, 2019
कुलगाम जिल्ह्यातील तुरीगाम भागात काही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली हाती. या माहितीनुसार सुरक्षा दलाने तुरीगाममध्ये शोध मोहीम हाती घेतली. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. दहशतवाद्यांच्या या गोळीबारचे सुरक्षा दलानेही चोख प्रत्युत्तर दिले. परंतु या चकमकीदरम्यान अमन ठाकूर शहीद झाले तर आणखी दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाख करण्यात आले आहे. ही चकमक अद्याप सुरूच असून या परिसरात दोन ते तीन दहशवादी लपल्याची माहिती मिळाली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.