HW News Marathi
देश / विदेश

सनी देओलची खासदारकी येणार धोक्यात ?

नवी दिल्ली | अभिनेता आणि गुरुदासपूरचे भाजपचे नवनिर्वाचित खासदार सनी देओल लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी अतिरिक्त खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी देओलला निवडणूक आयोगाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. यामुळे देओलची खासदारकी रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सनी देओल यांना भाजपने पंजाबमधील गुरुदासपूर येथील तिकीटावर निवडणूक लढविली आणि जिंकून आली आहे. निवडणूक आयोगाने प्रचारासाठी प्रत्येक उमेदवाराला ७० लाख रुपयांपर्यंतची मर्यादा आखून दिली होती. देओल यांनी प्रचारासाठी ८६ लाख रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार आल्या आहेत. यानंतर निवडणूक आयोग देओल यांच्या खर्चाचा हिशेबाची तपासणी केल्यानंतर या प्रकरणात दोषी ठरविण्यात आले. यावर निवडणूक आयोग काय निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आधार कार्डचा दुरुपयोग टाळण्यासाठी केंद्र सरकारने काढले ‘हे’ नवे आदेश; जाणून घ्या…!

Aprna

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द ! मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाला वर्ष पूर्ण

News Desk

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रामदास आठवले केरळ दौऱ्यावर

News Desk