HW News Marathi
देश / विदेश

व्यायाम करताना गुप्तांग अकडले प्लेटमध्ये

बर्लिन- व्यायाम शरिरासाठी आवश्यक आहे. परंतु चुकीचा व्यायाम अनेकदा जीवावर बेतू शकतो. जर्मनीमधील वॉर्म शहरात एका व्यक्तीचे गुप्तांग वजनाच्या प्लेटच्या होलमध्ये अडकले. ही बाब कुणाला सांगता येईना आणि दुख: लपवता येईना अशी झाली. अखेर काही जणांच्या मदतीने त्या वक्तीचे या संकटातून सुटका करण्यात आली.

जर्मनीतील डच न्यूज एजन्सीनुसार व्यायाम करत असताना त्या व्यक्तीचे गुप्तांग 2.5 किलो वजनाच्या प्लेटमध्ये अडकले. गुप्तांगात वजनाची प्लेट अडकल्यानंतर तेथील उपस्थितांना या व्यक्तीला अवघडलेल्या अवस्थेत रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात गेल्यानंतर ती प्लेट गुप्तांगातून वेगळी कशी करायची असा प्रश्न डॉक्टरांना पडला. कारण ती प्लेट गुप्तांगापासून वेगळी करण्यासाठी गरजेची साधनं तेथे उपलब्ध नव्हती. म्हणून मदतीसाठी तेथे अग्निशमन दलाला पाचरण करण्यात आलं. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी ग्राईंडर आणि हायड्रॉलिक कटरच्या साहाय्याने ती प्लेट कापून काढली. जवळपास तीन तासांच्या प्रयत्नानंतर पाच तुकडे करून ती प्लेट त्या व्यक्तीच्या गुप्तांगापासून वेगळी करण्यात आली.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“मोदींच्या वाराणसीतील सभेत काळ्या टोप्या आणि काळे मास्क उतरवण्यात आले, कलियुग म्हणतात ते हेच का?”

News Desk

इंधनाच्या किंमतींमध्ये पुन्हा कपात

Gauri Tilekar

कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएस सरकारच्या सर्व २१ मंत्र्यांचे राजीनामे

News Desk
देश / विदेश

अखेर दारूवर उतारा सापडला

News Desk

मुंबई- दारूचे व्यसन रोखणाऱ्या औषधाचा शोध लावण्यात संशोधकांना यश आले आहे. रोज सायंकाळी हे औषध दिल्यास मद्यपिचे व्यसन सुटू शकेल. जगभरात मद्यपींची संख्या मोठी आहे. मद्यपानानंतर मानवामध्ये कोणकोणते बदल होतात आणि त्यावर नियंत्रण कसे राखावे, या दृष्टीने आम्ही अनेक वर्षांपासून संशोधन करत होतो, असे ऑस्ट्रेलियातील अ‍ॅडलेड विद्यापीठातील पीएचडीचा विद्यार्थी जॉन जेकब्सन याने सांगितले. उंदराला औषध देऊन हा प्रयोग यशस्वी करण्यात आला.

प्रत्येक बदलानंतर आपले शरीर आणि मेंदू काही इशारा देत असतो. मद्यपानानंतर व्यसन रोखणारे हे औषध सेवन केल्यानंतरही मेंदूने काही इशारे दिले त्याची नोंद घेण्यात आल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले.मद्यपान केल्यानंतर मानवी शरीरातील मेंदूची भूमिका तपासण्याचा आमचा प्रयत्न होता, असे जेकब्सन यांनी सांगितले. मद्यपीला आम्ही तयार केलेले औषध दिल्यानंतर त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. मद्यपीला सायंकाळी मद्यपान करण्याची इच्छा झाली नाही, असेही जेकब्सन म्हणाले. हे संशोधन ‘ब्रेन बिहेविअर अँड इम्युनिटी’या मासिकात प्रसिद्ध झाले आहे.

Related posts

अर्थमंत्र्यांसह मोदी सरकार खोटारडे | राहुल गांधी

Gauri Tilekar

‘माझ्या मृत्यूची जबाबदारी सीबीआय घेणार का ?’

Gauri Tilekar

पश्चिम बंगालप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही पेगॅसस प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी !

News Desk