नवी दिल्ली : उत्तर भारतात गेल्या आठवड्या भरापासून धुळीचे वादळ धडकले आहे. या वादळामुळे शंभरहून अधिक जणांचा बळी घेतला होता. आता पुन्हा या वादळाचा फटका देशातील १५ राज्यांना बसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दिल्लीनंतर हे वादळ हरियाणात ७० किलोमीटर इतक्या वेगाने पोहोचले आहे. या वादळाचा सर्वात जास्त फटका उत्तर भारतातील राज्यांना वादळाचा बसण्याची शक्यता आहे.
#WATCH: Dust storm hits Delhi’s RK Puram. According to India Meteorological Department (IMD) a spell of rain/ thunderstorm accompanied with squall (wind speed 50-70 kmph) likely to occur over Delhi and NCR during next 3 to 4 hours. pic.twitter.com/xXc7AHHs5T
— ANI (@ANI) May 7, 2018
राजस्थानच्या अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू असून गाझियाबादमधील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नोएडामधील सर्व शाळादेखील बंद ठेवण्यात आल्या आहेत. हवाई वाहतुकीवर वादळाचा परिणाम झालाय. हवाई वाहतूक जवळपास २२ मिनिटे उशिराने सुरु असून दिल्ली विमानतळ परिसरात वाऱ्याचा वेग ६० किलोमीटर प्रतितास इतका असल्याने विमान सेवेवर देखील वादळाचा परिणाम झालेला दिसून येत आहे.
#WATCH Severe dust-storm hits Rajasthan's Jhunjhunu pic.twitter.com/i2YDic830b
— ANI (@ANI) May 7, 2018
उत्तराखंडमधील देहरादून येथे पाऊस आणि धुळीच्या वादळामुळे वीजेचे खांब कोसळले असून वीज पुरवठा खंडित झाला. उत्तराखंडमध्ये पुढील ४८ तासांसाठी हाय अलर्ट जाहीर केला आहे. वारा ७० ते ८० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.