HW News Marathi
देश / विदेश

प्रा. अभय अष्टेकर यांना आइन्स्टाईन पुरस्कार

मुंबई | भारतीय वंशाचे अमेरिकन शास्त्रज्ञ प्रा. अभय अष्टेकर यांना शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या नावाने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा आइन्स्टाइन पुरस्कार जाहीर झाला आहे. अमेरिकन फिजिकल सोसायटीने नुकतीच या पुरस्काराची घोषणा केली आहे. अभय अष्‍टेकर यांना हा पुरस्कार सामान्य सापेक्षता, ब्लॅक होल सिद्धांत आणि क्वांटम फिजिक्समधील योगदानाबद्दल देण्यात येणार आहे.

शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या या पुरस्काराची सुरुवात १९९९ मध्ये झाली होती. अमेरिकन फिजिकल सोसायटीद्वारे अष्टेकर यांना १० हजार डॉलर पुरस्कार स्वरूपात देण्यात येणार आहेत. गुरुत्वाकर्षण विज्ञानात चार दशकांपासून ते कार्यरत आहेत.

प्रा. अभय अष्टेकर हे पेन्सेल्व्हिनिया स्टेट यूनिवर्सिटीच्या इन्स्टिट्यूट फॉर ग्रॅव्हिटेशन अँड द कॉसमासचे निर्देशक आहेत. अभय अष्टेकर यांचा जन्म ५ जुलै १९४९ रोजी कोल्हापूर जिल्ह्यात झाला. त्‍यांनी टेक्सास विद्यापीठातून गुरुत्वाकर्षण विषयातील पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी अनेक नामांकित विद्यापीठात अध्यापनाचे काम केले आहे. अष्टेकर यांनी १९७४ मध्ये शिकागो विद्यापीठातून पीएच.डी प्राप्त केली. एवढेच नव्हे तर त्यांनी फ्रान्स, कॅनडा आणि भारतातील महत्वाच्या पदावर काम केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अमेरिकेच्या विमानतळावर पाक पंतप्रधानांचे उतरवले कपडे

News Desk

सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरघोड्या कायम

News Desk

CDS बिपीन रावत यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी दाखल, अमित शहांनी वाहिली श्रद्धांजली

News Desk
नवरात्रोत्सव २०१८

‘ती’ने परिस्थितीवर मात करत, जगासमोर ठेवला नवा आदर्श

News Desk

धनंजय दळवी | पैसा मिळवून देणाऱ्या जवळपास प्रत्येक कामात पुरुषांचीच मक्तेदारी पाहायला मिळते. काही कामे तर खास पुरुषांचीच, मग पुरुषांचेच म्हणून ओळखले जाणारे एखादे काम एखादी स्त्री जेव्हा पहिल्यांदा करते, तेव्हा सर्व समाजाच्या भुवया उंचावतात. अनेक लोक अशा स्त्रीला नावेही ठेवतात. ‘हे काम तर माणसांचं आणि या बयेला काय दुसरं कामंच मिळालं नव्हतं’, असा सल्लावजा प्रश्नही लोकांतून केला जातो. पण मूळ कोल्हापूरच्या असणाऱ्या पण मुंबईत राहणाऱ्या या महिलेने परिस्थितीवर मात करत. महिलांसमोर एक नवीन आदर्श ठेवला आहे. महिला देखील कोणत्या क्षेत्रात कमी नाहीत. मुंबई्च्या लोअर परळ येथील मध्यमवर्गीय कुटुंबात राहणाऱ्या संगीता राजू वंजारे या मुंबईतील पहिल्या महिला टॅक्सी चालक आहेत.

संगीता वंजारे यांच्या घरात आई-वडील आणि पाच बहिणी असा परिवार होता. त्यांचे वडील बीएमसीत कामाला होते. सर्वकाही सुरळीत सुरू आहे असे वाटत असतानाच अचानक तो काळा दिवस आयुष्यात आला. वडिलांचे अकाली निधन झाले. त्यानंतर कुटुंबावर हलाखीचे दिवस आले. मात्र, मी वडिलांची लाडकी आणि मोठी असल्यामुळे वडिलांनी जाता-जाता माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली. बहिणींची सर्वात मोठी जवाबदारी माझ्यावर होती. त्यांचे शिक्षण, लग्न सर्व काही पण आईसह आम्ही पाच बहिणी न डगमगता परिस्थितीला सामोऱ्या गेलो. मिळेल ते काम करू लागलो. दरम्यानच्या काळात आईला वडिलांच्या जागी बीएमसीत नोकरी मिळाली आणि परिस्थिती काहीशी सुधारली. या सर्व व्यापात संगीता यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. काही काळाने संगीता यांचे लग्न झाले. सासरची परिस्थितीही फारशी चांगली नव्हती. पण पैक्षांपेक्षाही मनाने, विचाराने श्रीमंत असलेले सासर त्यांना मिळाले.

गंमत म्हणून लागलेली ही पैज

संगीता एकदा नवऱ्याशी बोलताना सहज गाडी चालविण्याचा विषय निघाला. गाडी चालविणे कठीण नाही यावर चर्चा झाली. यातूनच पहिली टॅक्सी कोण चालवायला शिकणार, अशी पैज लागली. गंमत म्हणून लागलेली ही पैजच पुढे सर्वसामान्य गृहिणी असलेल्या संगीता यांना मुंबईतील पहिली महिला टॅक्सी चालक होण्याचा बहुमान मिळवून देणारी ठरली. सर्वात जास्त आनंद यावेळी त्यांच्या मिस्टरांना झाला. सुरुवातीला भीती वाटायची पण हळूहळू सवय झाली. अनेकांनी सुरवातीला मदत केली. माझा धीर वाढवला. वरळी नाका-करी रोड शेअर टॅक्सी चालक-मालक संघटना या सर्वांचा भक्कम पाठिंबा मिळत असल्यानेच लोअर परळ ते वरळी नाका या मार्गावरील महिला टॅक्सी चालक म्हणून माझा प्रवास सुखरूप सुरू आहे, असे संगीता सांगतात.

आयुष्यात खूप चांगले वाईट अनुभव आले. टॅक्सी चालविणे वाटते तेवढे सोपे नाही. मुंबई म्हटले की, वाहतूक कोंडी आलीच आणि त्यात कधी कडाक्याचे ऊन तर कधी प्रचंड पाऊस. त्यातच वाहनांच्या लांबच लांब रांगांमध्ये होणारा खोळंबा. अशावेळी जेवण, नैसर्गिक विधी सर्वांचीच पंचाईत होते. शिवाय डोके शांत ठेवून, कुठल्याही शॉर्टकटच्या मोहाला बळी न पडता टॅक्सी चालवावी लागते. जराजरी नजर विचलित झाली, स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले की अपघात ठरलेलाच. मात्र, संगीता संयमाने टॅक्सी चालवतात. स्त्रियांनी स्वत:मधील आत्मविश्वास जागविण्याची हीच ती वेळ एकदा का तो जागा झाला की मग अवघड असे काहीच नसते. ठरवले तर स्त्री कुठल्याही क्षेत्रात यशस्वीपणे वाटचाल करू शकते. या वाटेवरून पुढे जायचे असेल तर त्या स्त्रीची आत्मविश्वासासोबतच प्रामाणिक कष्टांचीही तयारी हवी. अतिआत्मविश्वास, अहंकार आपल्या जवळपासही फिरकणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. असे म्हणणाऱ्या आणि रोज हजारोंचे सारथ्य करणाऱ्या या दुर्गेचे कार्य सन्माननीय आहे. अश्या या संगीता वंजारे अनेकांसाठी प्रेरणास्थान आहेत. या दुर्गेला एच. डब्लू. मराठीचा मानाचा मुजरा.

Related posts

कर्तबगार वीरांगणा महाराणी ताराबाई भोसले

News Desk

आजचा रंग गुलाबी, ‘सिद्धीदात्री’ रूपात घ्या देवीचे दर्शन

News Desk

आजचा रंग हिरवा, ‘चंद्रघंटा’ रूपात घ्या देवीचे दर्शन

Gauri Tilekar