HW News Marathi
नवरात्रोत्सव २०१८

आजचा रंग हिरवा, ‘चंद्रघंटा’ रूपात घ्या देवीचे दर्शन

दुर्गा देवीचे हे तिसरे स्वरूप शांती देणारे आणि कल्याणकारी आहे. देवीच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र आहे म्हणून या रुपाला चंद्रघंटा असे म्हणतात. देवीच्या कृपेमुळे साधकांना अनेक अमूल्य वस्तू मिळतात, दिव्य सुगंध येतो व अनेक पवित्र ध्वनी ऐकू येतात.

आश्विन शुद्ध तृतीया आज आदिमाया आदिशक्ती विश्वरूप जगत जननी सर्व देवांना व भक्तजनांना ‘चंद्रघटा’ नामे दर्शन देते. या अलौकिक अशा देवीच्या दर्शनाने सर्व देवदेवता व भक्तगण पुलकित होऊन आनंदित झाले होते. त्या आनंदाच्या उत्साहात त्यांनी श्री देवी मातेला अनेक अलंकारांनी सजवून शृंगारीत केले. नाना विधी, सुवर्ण अलंकाराने आणि गळयातील चंद्रहाराने श्री देवी मातेचा कंठ अगदी फुलून गेलेला असतो. पीतांबराने देवीचे रूप खूपच सुंदर दिसत असते. ही देवी दशभुज आहे. त्या दहाही भुजा शस्त्राने आणि विविध अलंकारांनी सुशोभित केलेली दिसत आहे.

दशभुजा हे दशदिशांचे प्रतीक आहे. देवी आपल्या हातातील घंटा नादाने सर्वांना भयमुक्त करून निर्भय करते आणि भक्तांना नवजीवन, नवउत्साह, नवचैतन्य देऊन उत्साहित करते. या उत्साहाच्या भरात सर्वांनी देवीला साजशृंगार चढवून तिची पूजा केली आणि मनोभावे आरती करून प्रसन्न केले जाते.

दुर्गा देवीचे हे तिसरे स्वरूप शांती देणारे आणि कल्याणकारी आहे. देवीच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र आहे म्हणून या रुपाला चंद्रघंटा असे म्हणतात. देवीच्या कृपेमुळे साधकांना अनेक अमूल्य वस्तू मिळतात, दिव्य सुगंध येतो व अनेक पवित्र ध्वनी ऐकू येतात. या देवीच्या पुजेने आपल्या अंगी आत्मविश्वास येतो, भिती नाहीशी होते व त्याचबरोबर विनम्रता येते. देवीचे पूर्ण शरीर सुवर्ण रंगात असून ती दशभुज आहे. हातात खड्ग, बाण आदी शस्त्र आहेत. या देवीचे वाहन सिंह आहे .

पिण्डजप्रवरारूढ़ा चण्डकोपास्त्रकेर्युता। प्रसादं तनुते मह्यं चंद्रघण्टेति विश्रुता॥

आजची तिसरी माळ भक्तीभावाच्या सुमनांची निष्ठेच्या दोऱ्यामध्ये गुंफलेली श्रद्धा आणि कृतज्ञतेचा सदैव सुगंध दरवळणारी न सुकणारी ही शब्द सुमनांची तिसरी माळ श्री मातेच्या चरणी अपूर्ण असो.

सर्व स्वरूपे सर्वेशे सर्वे भक्ती समन्विते भयभ्य ना दुर्गे देवी नमोस्तुते

या देवी सर्व भुतेशु दया, क्षमा, शांती रुपेन संस्थिता नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘विक्रोळीच्या आई शिवाई’चे हे देखणे रूप

swarit

आदिशक्तीच्या आभूषणांना हिऱ्यांची सजावट

Gauri Tilekar

भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी

News Desk