HW News Marathi
देश / विदेश

पेट्रोल पंपावर असणारे मोदींचे फोटो हटवा – निवडणूक आयोग

नवी दिल्ली | पेट्रोल पंपांना निवडणूक आयोगाने आदेश दिला आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असणारे होर्डिंग ७२ तासांत हटवा. पेट्रोल पंपावर केंद्र सरकारच्या योजनांची जाहिरात करणाऱ्या होर्डिंगवर पंतप्रधानांचा फोटो असणं आचारसंहितेचं उल्लंघन असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. निवडणूक आयोगाने शुक्रवारी पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पद्दुचेरी या पाच राज्यांच्या निवडणूक तारखांची घोषणा केल्यानंतर आचारसंहिता लागू झाली आहे.

तृणमूल काँग्रेसने केलेल्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाकडून हा आदेश देण्यात आला आहे. तृणमूल काँग्रेसने कोरोना लसीकरण मोहिमेच्या पोस्टर आणि व्हिडीओंमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोचा वापर करण्यावरुन आक्षेप नोंदवला होता. निवडणूक आयोगाने पेट्रोल पंपांसोबतच कोरोना लसीकरण मोहिमेच्या प्रचारात वापरण्यात आलेला मोदींचा फोटोही ७२ तासांत हटवण्यास सांगितलं आहे.

दरम्यान २ दिवसांआधी भाजपनेही तृणमूल काँग्रेसविरोधात निवडणूक आय़ोगाकडे धाव घेत आचारसंहिता लागू झालेली असतानाही पश्चिम बंगालमधील दोन मंत्री मतदारांना आकर्षित करण्यासाठी आश्वासन देत असल्याचा आरोप केला होता. भाजपाने दोन्ही मंत्र्यांना विधानसभा निवडणूक लढण्यापासून रोखण्यात यावं अशी मागणी केली आहे. तृणमूल काँग्रेसने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राहुल गांधी आक्रमक

News Desk

कुणालाही भेटलो नाही, असल्या अफवांनी राजकारण हलत नाही ! संजय राऊतांचं स्पष्टीकरण

News Desk

एअर इंडिया पूर्वपदावर, सर्व्हर सुरळीतपणे सुरु

News Desk