HW News Marathi
देश / विदेश

गोल्डन बॉयचा मोठा सन्मान, संरक्षण मंत्री म्हणाले-..

दिल्ली | टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्ण जिंकणाऱ्या ‘गोल्डन बॉय नीरज चोप्रा’ला लष्कराने मोठा सन्मान दिला आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पुण्याच्या आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटचे (ASI) नाव बदलून ‘सुभेदार नीरज चोप्रा स्टेडियम’ करण्याची घोषणा केली. या नामकरण सोहळ्यासाठी सुवर्णपदक विजेते नीरज चोप्रादेखील उपस्थित होते. दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नीरजचा सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे नीरज चोप्रा हे लष्कराच्या कमांडमध्ये तैनात आहे.

आमचे सरकार खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी कटीबद्ध

या कार्यक्रमानंतर राजनाथ सिंह म्हणाले की, आमचे सरकार खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी कटीबद्ध असून संपूर्ण देशातील खेळाडूंना हे वास्तव माहीत आहे. आपले पंतप्रधान क्रीडा आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी काम करत आहेत. एखादी संस्था असो किंवा एखाद्याला वैयक्तिक पातळीवर सराव करायचा असेल, तर सरकार त्याला सर्वतोपरी मदत करेल असे आश्वासन सरक्षण मंत्र्यांनी यावेळी दिला. कार्यक्रमानंतर राजनाथ सिंह यांनी अनेक नव्या खेळाडूंशी चर्चा केली.

नीरज चोप्राचे सर्वच स्तरांतून स्वागत

भारत देश प्रगत तंत्रज्ञानाशिवाय महासत्ता होऊ शकते नाही असे सरक्षणमंत्र्यांनी कार्यक्रमापूर्वी सांगितले. ते ‘डीम्ड’ युनिव्हर्सिटी डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (डीआयएटी) च्या एका कार्यक्रमात बोलत होते. दरम्यान, त्यांनी DRDO सारख्या संस्थांचे कौतुक करत आम्हालाही याचे अभिमान होत असल्याचे ते म्हणाले.टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी एकमेव सुवर्णपदक जिंकणारे भारतीय खेळाडू नीरज चोप्राने पुन्हा एकदा पाकिस्तानी क्रीडाप्रेमींची मने जिंकली आहेत. भारताने अनेक वर्षांनंतर टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. त्यामुळे नीरज चोप्राचे सर्वच स्तरांतून स्वागत करण्यात आले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राला अंतिम फेरीपूर्वी आपला भाला मिळत नव्हता. परंतु, नंतर तो भाला पाकिस्तानी खेळाडू अर्शद नदीमच्या हातात दिसला. यानंतर अर्शद नदीमवर अनेक आरोप करण्यात आले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कठुआ बलात्कार हत्या प्रकरणाचा आज निकाल

News Desk

आयआयटी जेईई परीक्षेत महाराष्ट्राचा कार्तिकेय गुप्ता देशात पहिला

News Desk

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना रुग्णालयात केले दाखल

News Desk