HW News Marathi
देश / विदेश

मुंबईसह राज्याच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी(२७ फेब्रुवारी) मुंबईच्या सुरक्षेबाबत चर्चा करण्यासाठी तातडीची बैठक बोलावली होती. मुंबई आणि राज्यातील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विधभावनात ही बैठक बोलावली होती. नुकतीच ही बैठक संपली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्यात झालेल्या बैठकीत मुंबई हाय अलर्टवर असल्याचे सांगण्यात आले आहे. राज्यातील स्थितीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मुंबईला हाय अलर्ट दिला आहे. या बैठकीत पोलीस महासंचालकांसह अन्य पोलीस अधिकारी देखील उपस्थित होते. विशेषतः मुंबई शहरातील रेल्वे स्थानके, विमानतळ, शहरातील संवेदनशील स्थळांवरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात १४ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद झालेल्या भीषण हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले. याचा बदल घेत मंगळवारी (२६ फेब्रुवारी) पहाटे ३.३० च्या सुमारास भारतीय वायू दलाच्या ‘मिराज-२०००’ या १२ लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांवर १००० किलोचे बॉम्ब टाकले. यावेळी सामान्य नागरिकांना कोणतीही हानी पोहोचणार याची देखील दक्षता घेण्यात आली होती. भारताच्या या कारवाईने पाकिस्तान खवळून काहीतरी कुरघोडी करणार हे स्पष्ट असल्याने देशातील अनेक महत्त्वाच्या शहरांना, संवेदनशील ठिकाणांना हाय अलर्ट देण्यात आला आहे.

भारताच्या हवाई हद्दीमध्ये आज (२७ फेब्रुवारी) पाकिस्तानी लढाऊ विमान शिरल्याची महत्त्वाची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली होती. नौशेरा सेक्ट्रमधील राजौरी येथे पाकिस्तानी विमानाने घुसखोरी केल्याचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले होते. काहीच वेळापूर्वी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद घेऊन याबाबतची अधिकृत माहिती दिली. “भारतीय वायू दलाने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले मात्र वायू दलाचे एक विमान अद्याप परतले नसून भारतीय दलाचा एक पायलट देखील परतलेला नाही”, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी यावेळी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आधार कार्डचा दुरुपयोग टाळण्यासाठी केंद्र सरकारने काढले ‘हे’ नवे आदेश; जाणून घ्या…!

Aprna

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ पुरस्कार प्रदान

Gauri Tilekar

सैन्याला ६ महिने लागतील तर संघ ३ दिवसांमध्ये लढण्यासाठी तयार होईल – मोहन भागवत

News Desk