HW News Marathi
देश / विदेश

आधार-पॅन कार्ड लिंक करण्याचा आज शेवट दिवस

नवी दिल्ली | तुम्ही तुमचे आधार-पॅन कार्ड अजूनपर्यंत लिंक केले नसेल तर तुम्ही आजच्या आज लिंक करुन घ्या. कारण आज आधार-पॅन कार्डचा लिंक करण्याचा शेवटचा दिवस आहे. आधार-पॅन कार्ड एकमेकांशी जोडणे बंधनकारक असल्याचे केंद्र सरकारने गेल्या वर्षी सांगितले होते.

सरकारने आधार-पॅन कार्ड लिंकसाठी ३१ मार्च २०१८ पर्यंतचा वेळ देण्यात आला होता. यानंतर मुदत वाढवून ३० जून करण्यात आली होती. आधार-पॅन कार्ड लिंग न केल्यास करदात्याचे पॅन कार्ड रद्द केले जाऊ शकते.

खालीलप्रमाणे आधार-पॅन कार्ड लिंक करा

  • आयकर विभागाच्या www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर जा
  • होम पेजवर लाल रंगात लिंक आधार लिहलेल्या पर्यायावर क्लिक करा
  • जर तुमचे अकांऊट तयार नसेल तर रजिस्ट्रेशन करा
  • त्यानंतर लॉगइन केल्यावर प्रोफाईल सेटींग या पर्यायला निवडा करा
  • आधार कार्ड लिंक करण्यासाठीचा पर्या दिसेल
  • त्यावर क्लिक केल्यानंतर आधार नंबर आणि इतर माहिती सबमिट करुन सर्वात शेवटी लिंक आधार पर्यायावर क्लिक करा

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांना सरकारी बंगला खाली करण्याचे आदेश

News Desk

अनंतनाग येथे दहशतवाद्यांच्या गोळीबारात ५ सीआरपीएफ जवान शहीद

News Desk

शबरीमाला निर्णयाच्या निषेधार्थ केरळ बंद

swarit
मुंबई

भांडुप उड्डाणपुलावर कार आणि कंटेनरची धडक 

swarit

मुंबई | मुंबईतील भांडुप उड्डाणपुलावर कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे गाडी विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरला धडकली. यात तीन जण जखमी झाले आहेत. तर दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सकाळी ६.३० ते ६.४५ च्या सुमारास ही घटना घडली आहे.

ठाण्याच्या दिशेने जात असताना भांडुप उड्डाणपूलावर होंडा सिटी कार समोरून येणाऱ्या कंटेनरला धडकली. वाहनचालकांचे गाडीवरची पकड सुटल्यामुळे गाडी गाडी दुभाजकावरुन दुसऱ्या बाजूला जाऊन विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरला धडकली. MH04 HU 0072 असा अपघातग्रस्त गाडीचा क्रमांक आहे. होंडा सिटीमधून पाच तरुण प्रवास करत होते. यापैकी दोघांचा मृत्यू झाला, तर तिघे जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्याच फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Related posts

मरेच्या गणेशोत्सवासाठी १३२ विशेष गाड्या, ३० जुन पासून आरक्षण सुरु

swarit

३७ वर्षीय अमेरिकन नागरिक असलेल्या महिलेने  २७ व्या माळ्यावरून उडी घेऊन केली आत्महत्या 

News Desk

फोन टॅपमुळे सेनेच्या उपविभागप्रमुखांची हकलपट्टी

swarit