मध्यप्रदेश | संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन आहे. परंतू, कोरोनाचे संक्रमण काही केल्या अजून हवे तसे स्थिर झाले नसल्याने मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आजपासून (८ एप्रिल) मध्यप्रदेशमध्ये एस्मा (ESMA – Essential Services Maintenance Act) अर्थात ‘अत्यावश्यक सेवा व्यवस्थापन कायदा’ किंवा ‘जीवनावश्यक कायदा’ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याची माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. ‘नागरिकांचे हित लक्षात घेत योग्य व्यवस्थापनासाठी सरकारने राज्यात तत्काळ एस्मा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
नागरिकों के हित को देखते हुए #COVID19outbreak के बेहतर प्रबंधन के लिए आज से सरकार ने मध्यप्रदेश में एसेंशियल सर्विसेज़ मैनेजमेंट एक्ट (Essential Services Management Act) जिसे ESMA या हिंदी में ‘अत्यावश्यक सेवा अनुरक्षण कानून’ कहा जाता है, तत्काल प्रभाव से लागू कर दिया है।
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) April 8, 2020
आत्तापर्यंत मध्यप्रदेशात ३०० हून अधिक कोरोनाग्रस्त आढळले. यापैकी सर्वाधिक रुग्ण इंदोरमध्ये आढळले. तर मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ मध्ये आढळलेल्या रुग्णांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. राज्याचे हित लक्षात घेत आणि कोरोनाचा संसर्ग लवकरात लवकर आटोक्यात आणण्यासाठी हे प्रयत्न सुरु आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.