HW News Marathi
देश / विदेश

राम मंदिर भूमिपूजनाबाबत पवारांच्या भूमिकेला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा ..’शरद पवारांचं बरोबर आहे’

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुलाखतीनंतर खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सामनाला दुसऱ्यांदा मुलाखत दिली आहे. या दुसऱ्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर रोखठोक प्रतिक्रीया दिली आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिर भूमिपूजनाच्या मुद्द्यावर केलेल्या विधानावरही उत्तर दिले. राम मंदिर भूमिपूजनाबाबत बोलताना शरद पवार म्हणाले होते,‘काही लोकांना वाटतं राम मंदिर बांधून कोरोना जाईल‘.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पवारांना याबाबतीत पाठिंबा दिला आहे. पवार म्हणतात ते बरोबर आहे. मंदिराच्या माध्यमातून कोरोना बरा होणार नाही. त्यासाठी आपल्याला डॉक्टर्सचीच गरज आहे, असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं.त्यामुळे आता शिवसेनेच्या राम मंदिर भूमिपूजन भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे.

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिरावर केलेल्या विधानावरही विचारणा केली. शरद पवारांच्या राम मंदिर भूमिपूजन विधानानंतर भाजपने पवारांवर शाब्दीक हल्ला केला होता. आज अखेर उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. ते म्हणाले, शरद पवार यांनी अयोध्येत राम मंदिर उभं राहतंय त्यापेक्षा कोरोनाची चिंता जास्त असल्याचं म्हटलं. तसेच मंदिराच्या माध्यमातून कोरोना बरा होणार नाही. त्यासाठी डॉक्टर्स लागणार आहे, असं म्हटलं. यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “शरद पवार म्हणत आहेत ते बरोबर आहे. आपल्याला डॉक्टरांची गरज आहे. आपण ज्या सुविधा निर्माण करतोय त्या कोरोना बरा करणार नाहीत. आपल्याला त्यासोबत डॉक्टर हवे आहेत.

हे ही वाचा

राम मंदिर बांधून कोरोना आटोक्यात येत असेल तर भूमिपूजन अवश्य करा, पवारांचा मोदींना टोला

पवारांच्या बंगल्यावर भाजप ‘जय श्रीराम’चे ५० हजार पोस्टकार्ड पाठवणार

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लाल किल्ल्यावरील हिंसक आंदोलन प्रकरणी अभिनेता दीप सिद्धूला अटक

News Desk

मुंबई ते अहमदाबाद रेल्वेतील सीट्स रिकाम्याच रिकाम्या 

News Desk

ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचं निधन

swarit