HW News Marathi
देश / विदेश

देशात लस उपलब्ध होताच सगळ्यांना दिली जाणार – पंतप्रधान

नवी दिल्ली | सध्या भारतात कोरोनाच्या अनेक लसींवर चाचण्या सुरू आहेत, या सगळ्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठं विधान केलं आहे. जेव्हा भारतात कोविड-१९ वरील लस उपलब्ध होईल तेव्हा देशातील प्रत्येक नागरिकाला ती लस देण्यात येईल, यातून कोणीही सूटणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी स्पष्ट सांगितले आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधानांनी कोरोना लसीवर भाष्य केलं आहे. लसीच्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशात लस उपलब्ध होताच सर्वांना ही लस दिली जाईल. कोणालाही वगळण्यात येणार नाही अशी खात्री मी देशाला देतो. भारत सरकारने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयामुळे आणि लोकांच्या मदतीने बऱ्याच जणांचे जीव वाचले, लॉकडाऊन लागू करण्याचा आणि त्यानंतर अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्याचा कालावधी पूर्णपणे योग्य होता असं मोदी म्हणाले.

लस वितरणाची तयारी सध्या भारत सरकारकडून केली जात आहे, जेणेकरून वेळ येताच संपूर्ण देशामध्ये ही लस उपलब्ध होऊ शकेल. एका अंदाजानुसार सर्व देशवासीयांना लस देण्यासाठी सरकारने सुरुवातीला ५० हजार कोटी रुपयांचे बजेट ठेवले आहे. एका व्यक्तीला लस देण्यासाठी ३८५ रुपयांपर्यंत खर्च होईल असंही सांगण्यात आलं आहे

तथापि, अद्याप याची अधिकृत घोषणा झालेली नाही किंवा भारत सरकारने कोणतीही अधिकृत योजना जाहीर केलेली नाही. परंतु देशातील शास्त्रज्ञ सतत लस बनवण्याचे काम करत आहेत आणि या लसीची चाचणी आता पुढच्या टप्प्यावर पोहोचली आहे. नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने आपल्या जाहीरनाम्यात असे घोषित केले होते की, सत्तेत आल्यानंतर भाजप बिहारमधील सर्व नागरिकांना मोफत कोरोना लस देणार आहे.

त्यानंतर भाजपच्या या घोषणेवर प्रश्चचिन्ह उपस्थित केले. यावरून वाद निर्माण झाला.  विरोधकांनी भाजपच्या या घोषणेवर निशाणा साधला. निवडणुकीच्या फायद्यासाठी कोरोनाचा वापर केला जात आहे असा आरोप भाजपावर करण्यात आला. मात्र केंद्र सरकार राज्यांना ही लस उपलब्ध करून देईल त्यानंतर भाजप सरकार राज्य सरकार पातळीवर जनतेसाठी मोफत पुरवेल असं स्पष्टीकरण भाजपनं दिलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘संसदेत महिला सदस्यांना धक्काबुक्की तर ‘गुजरात मॉडेल’, नवाब मालिकांची खोचक टीका

News Desk

गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि मोदींचे निकटवर्तीय केशुभाई पटेल यांचे निधन

News Desk

आजपासून संसदेच्या अर्थसंकल्प अधिवेशनाचे दुसरे सत्र सुरू

swarit