नवी दिल्ली। ‘पाकिस्तानव्याप्त काश्मीर (पीओके) हा भारताचा अविभाज्य भाग आहे. आणि आम्ही एक दिवस त्यावर प्रत्यक्ष ताब्यात घेऊ,’ अशी ठाम भूमिका परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वाचे शंभर दिवस नुकतेच पूर्ण झाले आहेत. याबरोबरच परराष्ट्र मंत्रालयाचेदेखील १००दिवस पूर्ण झाले आहेत. यानिमित्त बोलताना परारष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ही ठाम भूमिका मांडली.
#WATCH: External Affairs Minister Dr Subrahmanyam Jaishankar says, "Our position on PoK (Pakistan Occupied Kashmir) has always been and will always be very clear. PoK is part of India and we expect one day that we will have the physical jurisdiction over it." pic.twitter.com/XpK0aPspmE
— ANI (@ANI) September 17, 2019
जयशंकर म्हणाले की,’ ‘कलम ३७० हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. पाकिस्तानचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. पाकिस्तानचा संबंध दहशतवादाशी आहे. त्यांनी तो मुद्दा सोडवावा. तसेच पाकिस्तानचे नाव न घेता एका शेजारी देशापासून वेगळ्या प्रकारचे आव्हान आहे’, असे जयशंकर म्हणाले. पाकिस्तानचे नाव न घेता ‘एका शेजारी देशापासून वेगळ्या प्रकारचे आव्हान आहे’, असे जयशंकर म्हणाले. ‘या देशाशी सीमापार दहशतवादाचा मुद्दा यशस्वीपणे सोडवला जाऊन तो सामान्य शेजारी होत नाही, तोपर्यंत हे आव्हान कायम राहील. सीमापार दहशतवाद, कलम ३७० हटविण्यासारख्या मुद्द्यांवर भारताने जगापुढे आपली भूमिका मांडली. पंतप्रधान मोदी यांनी मालदीव, श्रीलंका आणि भूतान यांचे दौरे करून त्याची सुरुवात केली, तर म्यानमार, श्रीलंका आणि अफगाणिस्तानचे नेते भारतात आले’, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
‘मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रमुख पाच देशांच्या नेत्यांसह जर्मनी आणि जपानच्या राष्ट्रप्रमुखांची भेट घेतली. उत्तर अमेरिका, युरोप, ईशान्य आशिया, आसियान आणि आखाती देश अशा पाच आघाड्यांवर संबंध दृढ झाले आहेत. हवामान बदल, जी-२०, ब्रिक्ससारख्या बहुविध देशांच्या व्यासपीठांवर होणाऱ्या चर्चा पाहिल्यास त्यात भारताची भूमिका आणि विचार पूर्वीपेक्षा अधिक स्पष्टपणाने ऐकले जात आहेत’, याकडे जयशंकर यांनी लक्ष वेधले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.