HW News Marathi
Covid-19

प्रसिद्ध टेनिस खेळाडू नोवाक जोकोविचला कोरोनाची लागण

नवी दिल्ली । प्रसिद्ध टेनिसपटू नोवाक जोकोविचला कोरोनाची लागण झाली आहे. नोवाक जोकोविचने काल (२२जून) कोरोनाची चाचणी केली होती. जोकोविचची पत्नीचा ही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दिलासादायक बाब म्हणजे जोकोविचच्या मुलांची कोविड टेस्ट निगेटिव्ह आली आहे.

नोवाकने सर्बिया आणि क्रोएशिया येथील स्पर्धेत सहभाग घेतला होता. येथील काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यानंतर नोवाकने आपली चाचणी करुन घेतली. अंतिम सामना रद्द झाल्यानंतर नोवाक क्रोएशियाला निघून गेला होता. यानंतर त्याने आपली चाचणी केली होती. याआधी स्पर्धेत सहभागी विक्टर ट्रोईकी याने आपण आणि आपल्या पत्नीला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली होती. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असणारा नोवाक या दौऱ्यातील प्रमुख होता.

नोवाक टूरमध्ये सहभाग घेण्यावरून जोकोविचवर टीका होत होती. ब्रिटनच्या डेन इवांसने जोकोविचवर निशाणा साधला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परळीत आढळलेल्या कोरोना बाधितांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग युद्धपातळीवर सुरू, नागरिकांनी सहकार्य करावे 

News Desk

“आम्हालाही लोकांची काळजी आहे”, सर्वोच्च न्यायालयाला मोदी सरकारचे प्रत्युत्तर

News Desk

लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन अधिकाऱ्यांनी काम करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

News Desk