HW Marathi
देश / विदेश राजकारण

शेतकऱ्यांचा आज भारत बंद, रस्ते, रेल्वे वाहतुकीला फटका बसणार?

नवी दिल्ली | केंद्र सरकारच्या ३ नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. दिल्लीच्या सीमांवर हे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला आता १२० दिवस पूर्ण होत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या संयुक्त किसान मोर्चाने आज (२६ मार्च) भारत बंदचं आवाहन केलं आहे.

केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात देशातील विविध शेतकरी संघटनांच्या संयुक्त किसान मोर्चाने आज ‘भारत बंद’चं आवाहन केलं आहे. सकाळी ६ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत दुकानं, मॉल आणि संस्था बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. संयुक्त किसान मोर्चाने पंजाबमध्ये रेल्वे वाहतूक रोखण्याचा इशारा दिला आहे. तसंच दूध आणि भाजीपाल्याचा पुरवठाही रोखण्याची धमकी दिली आहे. राजधनी दिल्ली, हरयाणा आणि पंजाबमध्ये पोलिसांना सतर्क करण्यात आलं आहे.

बाजार बळजबरीने बंद केले जाणार नाही. कारण अनेक व्यापारी आणि कामगार संघटनांनी बंदला पाठिंबा दिला आहे, असं संयुक्त किसान मोर्चाचे नेते रुलदा सिंह मानसा यांनी चंदीगडमध्ये सांगितलं. रास्ता रोकोसह रेल रोकोही केला जाईल आणि धरणे आंदोलन करून रेल्वे वाहतूक रोखली जाईल. आवश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद केल्या जातील, असं संयुक्त किसान मोर्चातील नेत्यांने सांगितलं आहे.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला १२० दिवस पूर्ण होत आहेत. यामुळे २६ मार्चला संयुक्त किसान मोर्चाने ‘भारत बंद’चं आवाहन केलं आहे. केंद्र सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे हे आंदोलन सुरू आहे. काँग्रेस, डाव्यांसह इतर विरोधी पक्षांनीही या आंदोलना पाठिंबा दिला आहे. तर २८ मार्चला होळीच्या दिवशी कृषी कायद्यांच्या प्रति जाळण्यात येणार आहेत. ज्या राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत, ती राज्य भारत बंदमधून वगळण्यात आली आहेत. तसंच या ‘भारत बंद’चा परिणाम २६ मार्चला दिल्लीतही दिसून येईल, असा दावा संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी केला आहे.

 

Related posts

संगणक युगाची ओळख करून देणाऱ्या राजीव गांधी यांची ७४ वी जयंती

अपर्णा गोतपागर

भास्कर जाधवांचा राजीनामा घेण्यासाठी विधानसभा अध्यक्ष मोटारसायकलवरून दाखल

News Desk

मोठी बातमी ! विशेष न्यायालयाकडून सचिन वाझेंना १० दिवसांची NIA कोठडी

News Desk