HW News Marathi
देश / विदेश

Gujarat Assembly Election 2022 LIVE Updates: पहिल्या टप्प्यातील ८९ जागांसाठी मतदान सुरू

 मुंबई। गुजरात विधानसभा निवडणुकीच्या (Gujarat Assembly Election) पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होणार आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये १९ जिल्ह्यातील ८९ जागांसाठी मतदान सुरू झाले आहे. या विधानसभा निवडणुकीसाठी आज (१ डिसेंबर) सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात होईल तर सायंकाळी ५ वाजेपर्यंत नागरिकांना आपला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
दरम्यान, गुजरात विधानसभेच्या पहिल्या टप्प्यात ७० महिला उमेवार यांच्यासह ७८८ उमेदवार निवडणुकीच्या लढवित आहेत. पहिल्या टप्प्यात काँग्रेस आणि भाजपचे ८९ उमेदवार असून आपने ८८ जागांवर उमेदवार दिले आहेत. एआयएमआयएमने ६ जागेवर उमेदवार दिले आहेत. गुजरात विधानसभा निवडणुका दोन टप्प्यात पार पडणार आहेत. पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान सुरू झाले आहे. तर दुसऱ्या टप्प्यासाठी ५ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.

LIVE Updates

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान सुरू
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसमुळे नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मांडण्याची गरज पडली !

News Desk

उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा, मायावतींची मागणी

News Desk

यमुना एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, २९ जणांचा मृत्यू

News Desk