नवी दिल्ली | केंद्र सरकार आणि आंदोलनकर्ते शेतकरी यांच्या बैठकीत कोणताही ठोस तोडगा आज निघालेला नाही. त्यामुळे आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. दिल्लीत या बैठकीच्या फेऱ्या पार पडल्या मात्र यातून ठोस असा काहीही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आता आपले आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांना गुरुवारी म्हणजेच ३ डिसेंबरला पुन्हा एकदा चर्चेसाठी सरकारने बोलावलं आहे. पुढची बैठक ३ डिसेंबरला दुपारी १२ वाजता होणार आहे.
शेतकऱ्यांनी काय म्हटले?
“केंद्र सरकारसोबत झालेल्या बैठकीत आज कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आम्हाला एक समिती स्थापन करण्याचा सल्ला दिला. सरकार त्या छोट्या समितीसोबत चर्चा करेल असंही सांगण्यात आलं. मात्र आम्हाला सरकारचा हा प्रस्ताव मंजूर नाही. आता सरकारसोबत पुढची बातचीत गुरुवारी होईल.” असं बैठकीत उपस्थित असलेल्या एका शेतकऱ्याने सांगितलं.
कृषी मंत्र्यांनी काय म्हटले?
शेतकऱ्यांसोबत झालेली चर्चा चांगली होती. शेतकऱ्यांची एक समिती स्थापन व्हावी असं आमचं मत आहे. मात्र आम्हा सर्वांशी चर्चा झाली पाहिजे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आम्ही शेतकरी बांधवांना विनंती करतो की त्यांनी आंदोलन मागे घ्यावं आणि सरकारशी बातचीत करावी. शेवटी शेतकऱ्यांनी निर्णय घ्यावा. अशी भूमिका कृषी मंत्र्यांनी मांडली आहे.
Our meeting with Farmers unions' representatives was meaningful. We told leaders to form a smaller group & discuss the act clause by clause. Govt has no objection over any discussion. 4th round of talks will take place on 3rd Dec: Union Agriculture Minister Narendra Singh Tomar pic.twitter.com/4yIZ32B5Bs
— ANI (@ANI) December 1, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.