नवी दिल्ली । मोदी सरकारच्या ३ नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांकडून ५० दिवसांहूनही अधिक दिवस दिल्लीच्या सीमांवर आंदोलन सुरू आहे. दरम्यान, याविषयी केंद्र सरकारशी वारंवार चर्चा करूनही कोणताही मार्ग निघाला नसल्याने आज (२६ जानेवारी) प्रजासत्ताक दिनानिमित्त शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीचा इशारा दिला होता. या रॅलीदरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून दिल्लीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र, यावेळी दिल्लीच्या दिशेने कूच करण्यात हजारो शेतकऱ्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स तोडल्याने प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या सीमांवर तणाव वाढल्याचे वृत्त येत आहे.
#WATCH Protesting farmers break police barricading at Delhi-Haryana Tikri border
Farmers are holding tractor rally today in protest against Centre's three Farm Laws#RepublicDay pic.twitter.com/3tI7uKSSRM
— ANI (@ANI) January 26, 2021
प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावरील सुरू असलेले संचलन पार पडल्यानंतर शेतकऱ्यांच्या या ट्रॅक्टर मोर्चाला परवानगी देण्यात आलेली आहे. दरम्यान, यासाठी दिल्ली पोलिसांनी आखून दिलेल्या मार्गाने जाण्यास शेतकऱ्यांनी नकार दिला आहे. “दिल्ली पोलिसांनी सांगितलेला मार्ग आम्हाला मान्य नाही. आम्ही दिल्लीतच जायचे आहे”, अशी कठोर भूमिका आता शेतकऱ्यांनी घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर, सध्या शेतकरी आणि पोलिसांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. दिल्ली-हरियाणाच्या तिकरी बॉर्डरवर शेतकऱ्यांची पोलिसांनी सुरक्षेसाठी उभारलेले बॅरिकेड्स तोडले आहेत.
तब्बल ५० दिवसांहूनही अधिक काळ आपल्या मागण्यांसाठी हे शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. केंद्र सरकरसोबत जवळपास १२ ते १३ बैठका झाल्या आहेत. तरीही कोणताही मार्ग निघत नसल्याने इतके दिवस शांततापूर्ण आंदोलन करणारे शेतकरी आज आक्रमक पवित्र्यात दिसत आहेत. दिल्लीकडे कूच करणाऱ्या या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला रोखणे पोलिसांसाठी देखील मोठे आव्हान असून याच पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सीमांवर तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.