HW News Marathi
देश / विदेश

महीला आयएएस अधिकारी लैंगिक छळाची शिकार

हरयाणा | आपल्या वरिष्ठ अधिका-याने लैंगिक छळ करत धमकी दिल्याचा आरोप हरयाणामधील एका महिला आयएएस अधिका-याने केला आहे. या महिला अधिका-याने फेसबुकच्या माध्यमातून केलेला हा आरोप वरिष्ठ अधिका-याने फेटाळला आहे. अधिकृत फाइल्सवर प्रतिकूल प्रतिक्रिया दिल्याने वरिष्ठ अधिकारी मला लैंगिकरित्या त्रास देत आहेत. तसेच, अधिकृत फाइल्सवर प्रतिकूल प्रतिक्रिया लिहिल्यास त्याचा परिणाम वार्षिक गोपनीय अहवाला (एसीआर) वर होईल, अशी धमकी दिल्याचे महिला अधिका-याने म्हटले आहे.

यासंदर्भात चंदीगड पोलिसांना रविवारी ईमेलद्वारे तक्रार पाठविली आहे. तसेच राज्याच्या मुख्य सचिवांना वारंवार फोन आणि मेसेजेस करुनही प्रतिसाद मिळू शकला नाही, त्यामुळे फेसबुकवर लेखी तक्रारीचे पाऊल उचलले आहे, असे या महिलेने म्हटले आहे. याशिवाय, वरिष्ठ अधिकाऱ्याने मला 31 मे रोजी एका खोलीत बोलावून घेतले आणि बाकी अधिकाऱ्यांना त्या खोलीत प्रवेश न करण्यास सांगितले. त्यांनी मला विचारले की, मला कोणत्या प्रकारचे काम करायचे आहे, विभागीय की किरकोळ काम? आणि मग त्यांनी मला फाईल्सवर प्रतिकूल प्रतिक्रिया लिहणे बंद करण्यास सांगितले. त्यांनी मला सांगितले की, नववधूला ज्याप्रमाणे गोष्टी समजावून सांगितल्या जातात, त्याप्रमाणेच मी तुला समजावून सांगेन. त्यावेळी त्यांचे वर्तन अनैतिक होते, असेही या महिला अधिका-याने म्हटले आहे.

दरम्यान, वरिष्ठ अधिका-यांने महिला अधिका-याकडून करण्यात आलेले आरोप फेटाळले आहेत. ते म्हणाले की, मी यासंदर्भातील कोणत्याही प्रकारच्या चौकशीसाठी तयार आहे. कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून योग्य काम करुन घेणे हे माझे कर्तव्य आहे आणि मी बऱ्याचवेळा तिला अधिकृत फाइल्समध्ये चुका असल्याचे सांगितले होते, परंतु त्या चुका समजावून सांगण्यात काही गैर नाही, त्यांनी सांगितले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

CBSE बोर्डाच्या १०वी-१२वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

News Desk

रशिया-युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थांना मायभूमीत आणण्यासाठी जयंत पाटलांची पंतप्रधानांकडे मागणी

Aprna

“मोदींनी कधी शेतकऱ्यांची साधी विचारपूस केली का ? हा प्रजासत्ताक आहे का?”

News Desk