HW News Marathi
राजकारण

उदयनराजे स्वतःच्या जीवावर निवडून येतात

पुणे | पुण्यात हडपसर येथे लोकनेते गोपीनाथराव मुंडे उद्यानाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. या सोहळ्याला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे उपस्थित राहिल्या होत्या. यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या,आमचे भाऊ उदयनराजे स्वतःच्या जीवावर निवडून येतात, त्यांना पक्षाची गरज नाही असेही त्या म्हणाल्या.

त्याचबरोबर राष्ट्रवादीचा लवकरच समारोपाचा कार्यक्रम होईल, त्यांचे ४ खासदार आहेत त्यातले तीन स्वतःच्या जीवावर निवडून येतात, असा टोलाही पंकजा मुंडेंनी यावेळी राष्ट्रवादीला लगावला. राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनावर पंकजा मुंडे यांनी सडकून टिका केली. पुढे बोलताना पंकजा म्हणाल्या, जे गरीबांच्या गल्ल्यावर डल्ला मारायचे ते आता हल्लाबोल करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छत्तीसगडमध्ये नवे पर्व

News Desk

वेदांता प्रकल्पावरुन सुधीर मुनगंटीवारांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार

Darrell Miranda

चंद्रकांत पाटलांची पलटी, म्हणाले राजकीय संन्यास नाही

News Desk