HW News Marathi
देश / विदेश

अखेर मोदी सरकारने जिंकला विश्वास

नवी दिल्ली | भाजप सरकारच्या चार वर्षांच्या कार्यकाळात पहिल्यांदा अविश्वास ठराव मांडण्यात आला होता. या अविश्वास ठराकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. भाजपाकडे बहुमत असून देखील मतदान भाजपाचे सदस्य भाजपाला मतदान करणार नाहीत असे देखील बोलले जात होते. परंतु शुक्रवारी दिवसभरात सर्व पक्षांची मते जाणून घेतल्यानंतर उशीरा मतदान घेण्यात आले. त्यावेळी अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने केवळ १२६ मते, तर मोदी सरकारच्या बाजूने ३२५ मते पडल्यामुळे या अविश्वास प्रस्तावात मोदी सरकारने विश्वास जिंकल्याचे चित्र पहायला मिळाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात तेलगू देसम आणि काँग्रेसने हा अविश्वास ठराव मांडला होता. मोदी सरकारकडे लोकसभेत आवश्यक संख्याबळ असल्याने हा अविश्वास प्रस्ताव पारित होणार याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र या ठरावादरम्यान काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठविल्याचे पहायला मिळाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी गेल्या चार वर्षातील सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा लोकसभेत मांडला. या सर्व घडामोडींनंतर झालेल्या मतदानात भाजपाच्या पारड्यात ३२५ मते पडल्यामुळे मोदी सरकारचा विजय झाला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मद्रास न्यायालयाने ‘टिकटॉक अ‍ॅप’वरील बंदी उठवली

News Desk

मल्ल्याच्या प्रत्यार्पण आदेशावर स्वाक्षरी झाली, मात्र ‘ही’ आहे अडचण

News Desk

अतिरिक्त चलनसाठ्यावरून आरबीआय-सरकारमध्ये पुन्हा वाद ?

News Desk
देश / विदेश

पंतप्रधानांचा राहुल गांधींना सवाल….

News Desk

नवी दिल्ली | अविश्वास प्रस्तावाबाबत संसदेत कॉंग्रेस पक्षाची भूमिका मांडताना कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर प्रचंड टिका केली. त्यातच स्वता उठून नरेंद्र मोदी यांची गळाभेट देखील घेतली. पक्षाच्या वतीने मत मांडताना पंतप्रधानांवर आरोप केल्यानंतर ते आपल्या नजरेला नजर भिडवू शकत नाहीत असे वक्तव्य कॉंग्रेस अध्यक्षांनी केले होते. कॉंग्रेस अध्यक्षांच्या अशा मिश्कील वक्तव्यावर तुमच्या डोळ्यांना डोळे भिडवणारे आम्ही कोण? असा सवाल पंतप्रधानांनी राहुल गांधींना केला.

देशातील विविध पक्षांच्या सदस्यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी या प्रस्तावावर पंतप्रधानांनी मत मांडले. यावेळी बोलताना मोदी म्हणाले, ”तुमच्या डोळ्याला मी डोळे कसे भिडवणार, मी एका गरिब आईच्या पोटी जन्माला आलो, मी कामगार आहे, तुम्ही नामदार आहात. तुमच्या डोळ्यांना डोळे भिडवण्याचे धाडस माझे नाही.

काँग्रेसच्या नजरेला नजर मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे काय होते, हे आम्ही पाहिले आहे. आज डोळ्यांबाबत बोलताना जो डोळे मारण्याचा खेळ झाला तो सगळ्या देशाने पाहिला आहे”, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत राहुल गांधी यांच्या आजच्या सभागृहातील कृत्याचा खरपूस समाचार घेतल्याचे पहायला मिळाले. यावेळी मोदींनी बोटांनी डोळे मिचकावण्याची कृती केल्याने सभागृहात एकच हास्य पसरले.

Related posts

तिरुपती बालाजी मंदिर दर्शनासाठी खुले

News Desk

अमरनाथ हल्ल्यामागे पाकिस्तानी दहशतवादी इस्माईल मास्टरमाईंड

News Desk

PMLA कायद्यातील ईडीचे अधिकार अबाधित; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

Aprna