HW News Marathi
देश / विदेश

सरकार विरोधी अविश्वास प्रस्तावाला पंतप्रधान मोदींचे उत्तर

Live

नवी दिल्ली | मोदी सरकार विरोधात आज संसदेत अविश्वास ठरावावर सर्व पक्षांचे सदस्यांनी आपली बाजू मांडली. प्रत्येक पक्षाला आपली बाजू मांडण्यासाठी ठराविक वेळ देण्यात आला होता. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह वेगवेगळ्या पक्षातील अनेक नेत्यांनी संसदेत मोदी सरकारच्या कामाचा पाढा वाचला. मोदीवर चौफेर टिका झाल्याचे पहायला मिळाले. सर्व सदस्यांच्या मतमांडणी नंतर पंतप्रधान मोदी यांनी दिवसभरात झालेल्या टिकांना प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी –

५ हजारहून जास्त लोकांनी नवीन कंपन्या सुरु केल्या.

१ वर्षात २० लाख लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

झुंडशाही विरोधात राज्य सरकारने कठोर भूमिका घ्यावी.

बॅंका सुधारण्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय सरकारने घेतले.

एनडीए सरकार सत्तेत नसते तर देश संकटात आला असता.

वुई वान्ट जस्टीस, पंतप्रधान मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांचा पुन्हा एकदा गोंधळ.

विषेश राज्याचा दर्जा देण्यासाठी आंध्रप्रदेशला मदत केली.

टीडीपीने आपले अपयश झाकण्यासाठी डा नवीन डाव खेळलाय.

आंध्रप्रदेशला विषेश पॅकेज दिले.

आंध्र प्रदेशला विषेश राज्याचा दर्जा देण्यापेक्षा विशेष पॅकेज दिले पाहिजे हा नीती आयोगाचा अहवाल.

कॉंग्रेसने आजपर्यंत सर्वच नेत्यांना धोका दिला. धोका देणे ही कॉंग्रेसची सवय.

मी चौकीदार आहे म्हणून भागीदार आहे, तुमच्यासारखे सौदागर नाही.

आरक्षण संपेल, दलितांचे रक्षण करणारे कायदे संपतील, अशा अफवा पसरवल्या जात आहेत.

विरोधकांकडून सत्याचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला जातोय.

राफेलचा मुद्दा आणला, देशाला भुलविण्याचे काम केले जात आहे.

2024 मध्ये तुम्ही पुन्हा एकदा अविश्वास प्रस्ताव आणावा, अशी तुम्हाला संधी मिळण्यास देव तुम्हाला सहाय्य करो .

तुम्हाला एवढी ताकद मिळावी की 2024 मध्ये तुम्ही पुन्हा अविश्वास प्रस्ताव आणावा, मोदींचा विरोधकांना टोला.

काँग्रेसला स्वत:वर अविश्वास आहे, त्यांना विश्वास नाही. स्वच्छ भारत, आंतरराष्ट्रीय योगदिवस, भारताचे सरन्यायाधीश, निवडणूक आयोगावरही.

काँग्रेसला स्वत:वरच अविश्वास आहे आणि अविश्वासच त्यांची कार्यशैली आहे.

बेहिशेबी मालमत्तेचं विधेयक 20 वर्षे मंजूर केलं गेलं नाही, कुणाला वाचवण्याचा प्रयत्न होता?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून गेल्या चार वर्षातील सरकारच्या कामाचा पाढा .

‘उज्ज्वला योजने’चा साडेचार कोटी महिलांना फायदा झाला.

जितका अविश्वास सरकारवर करत आहात, तेवढा विश्वास मित्रपक्षांवर करा, मोदींचा काँग्रेसला टोला.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

100 कोटी एलईडी बल्बची आतापर्यंत विक्री झाली.

कुठल्याही राजकारणाविना आम्ही ‘सबका साथ, सबका विकास’ मंत्रानुसार काम करतोय.

32 कोटी जनधन खाते उघडण्याचे काम आमच्या सरकारने केले.

व्हुई वॉन्ट जस्टीस म्हणत विरोधकांचा गोंधळ.

संख्याबळाच्या जीवावर आम्ही इथे, स्वताच्या स्वार्थासाठी देशावर अविश्वास दाखवू नका.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण सुरु असताना टीडीपीच्या खासदारांचा गोंधळ.

मोदींच्या भाषणा दरम्यान विरोधकांचा गोंधळ.

पंतप्रधान होण्यासाठी सगळेच इच्छूक, पण पंतप्रधान होण्यासाठी लोकं पंतप्रधान निवडून देतात.

मोदी हटाव हा अविश्वास प्रस्तावाचा एकमेव हेतू.

अविश्वास प्रस्ताव म्हणजे विकासाला विरोध.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुन्हा एकदा पीयूष गोयल यांच्या हाती रेल्वे मंत्री पदाचा कार्यभार

News Desk

देशात १४७ कोरोना बाधित, राज्यात एकूण रुग्ण संख्या ४२ वर

swarit

राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने नागरिकांना भेट, ऑनलाईन तपासा सर्व तपशील

News Desk