HW News Marathi
देश / विदेश

ओला-उबरमुळेच वाहन क्षेत्रात मंदी | निर्मला सितारामण

नवी दिल्ली | ओला-उबरमुळे वाहन क्षेत्रात मंदी आल्याचा अजब दावा, अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी केला आहे. देशात वाहन क्षेत्रात तब्बल १९ वर्षांनंतर मोठी मंदी सुरू आहे. यामुळे लाखो लोकांना रोजगार गमावला आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला दोषी धरण्यात येते आहे. सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे देशात मंदी असल्याच्या प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सितारामणने घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाल्या. वाहन क्षेत्रातील मंदीवर भाष्य करताना म्हणाले की, ओला-उबरमुळे वाहन क्षेत्रात मंदी आल्याचा अजब दावा केला.

दरम्यान, जीएसटी दरामुळे ऑटो व्यवसायिक अडचणीत येत असल्याचाही त्यांनी यावेळी सांगितले. जीएसटी दराच्या चढ उतारावर बोलताना, ओला ऊबरवर बोट ठेवत निर्मला सितारामण म्हणाल्या, “बीएस६ स्टँडर्ड, नोंदणी शुल्काशी संबंधित प्रकरणे आणि लोकांची मानसिकता याचा वाहन क्षेत्रावर सर्वाधिक परिणाम झाला आहे. सध्या जास्तीत जास्त लोक गाडी खरेदी करण्याऐवजी ओला-उबरला प्राधान्य देतात. लोक गाडी खरेदी करुन ईएमआय भरण्यापासून स्वतःला दूर ठेवतात आणि ओला-उबरला प्राधान्य देतात.”

सीतारमण म्हणाल्या, “सरकार सकल घरेलु उत्पन्न वाढवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहे. शिवाय जीडीपीमधील घट हा विकासाच्या प्रक्रियेतीलच एक भाग आहे. पुढील तिमाहीत जीडीपी कसा वाढेल यावरच सरकारचा भर आहे. तसेच सरकार वाहन क्षेत्रातील मंदीतून बाहेर येण्यासाठी काम करत आहे. यासाठी लवकरच काही निर्णय घेतले जातील.” असे यावेळी त्यांनी सांगीतले. दरम्यान, ऑटोमोबाईल क्षेत्रातील मंदीने लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. ग्राहकांनी वाहन खरेदीकडे पाठ फिरवल्याने नाईलाजाने कंपन्यांनाही वाहनांची निर्मिती बंद करावी लागत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात आजपासून नॅशनल डिजीटल हेल्थ मिशनची सुरुवात – नरेंद्र

News Desk

सोमालिया पुन्हा एकदा बॉम्बस्फोटानं हादरलं, 14 जणांचा मृत्यू, 16 जण जखमी

News Desk

त्यांच्यात भगवान श्रीकृष्णाची चतुरता आहे – मंगलप्रभात लोढा

News Desk