नवी दिल्ली | कोरोनाच्या काळात देशाची अर्थव्यवस्था कोलमडली होती. मात्र आता पुन्हा एकदा ती स्थिर होत असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेच एप्रिल महिन्याच्या तुलनेत सुधारणा होत असल्याची माहिती त्यांनी दिली. रिझर्व्ह बँकेच्या द्विमासिक पतधोरण आढाव्याबाबतची बैठक आज (६ ऑगस्ट) संपली. रिझव्र्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या २४व्या बैठकीला मंगळवारपासून सुरुवात झाली होती. दरम्यान, रिझर्व्ह बँकेच्या रेपो आणि रिव्हर्स रेपो दरात कोणताही बदल करण्यात आला नसल्याची माहितीही यावेळी देण्यात आली आहे.
#WATCH live: RBI Governor Shaktikanta Das addresses the media https://t.co/QmpDzOeQkX
— ANI (@ANI) August 6, 2020
लॉकडाऊन आणि कोरोनामुळे रिझर्व्ह बँकेने EMI वरील व्याज दरात २ वेळा १.५ टक्क्यांनी कपात केली आहे. याशिवाय रेपो दर टक्के तर रिव्हर्स रेपो दर ३.३ टक्के आहे. यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही अशी माहिती शक्तिकांत दास यांनी दिली आहे. रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण आढावा बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. रेपो दरात बदल म्हणजे तुम्हाला ईएमआय किंवा कर्जाच्या व्याज दराबाबत कोणताही दिलासा मिळणार नाही. रेपोदर 4 टक्के तर रिव्हर्स रेपो दर 3.35 टक्के असल्याची माहिती RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली आहे.
Repo rate remains unchanged at 4%: RBI Governor Shaktikanta Das pic.twitter.com/ubMdixM16p
— ANI (@ANI) August 6, 2020
Reverse repo rate also remains unchanged at 3.3%: RBI Governor Shaktikanta Das https://t.co/Z6EnJlO6u6
— ANI (@ANI) August 6, 2020
पुढील काळात खाद्यपदार्थांचे दर वाढण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली. “यावर्षी जून महिन्यात वार्षिक महागाई दर मार्चच्या तुलनेत वाढून ५.८४ टक्क्यांवरून ६.०९ टक्क्यांवर आला आहे. रिझर्व्ह बँकेच्या मीडिअम टर्म टार्गेटपेक्षा तो अधिक आहे. रिझर्व्ह बँकेचं हे टार्गेट २ ते ६ टक्क्यांच्या दरम्यान आहे,” असंही यावेळी सांगण्यात आले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.