HW News Marathi
महाराष्ट्र

सिनेसृष्टीतील आणखी एका अभिनेत्याने केली आत्महत्या !

मुंबई | सिनेसृष्टीतील आणखी एका अभिनेत्याने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. अभिनेता समीर शर्मा याने मुंबईतील त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे. सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येतून सावरत असताना आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे.

‘ये रिश्ते है प्यार के’, ‘सास भी कभी बहु थी’, ‘कहानी घर घर की’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांतून समीर झळकला होता. दोन दिवसांपूर्वीच त्यानं ही आत्महत्या केली असून, त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडल्याची माहिती कळत आहे. दरम्यान समीरची आत्महत्या आता कलाविश्वाला आणखी एक हादरा देऊन गेली आहे. त्याच्या घरातून अद्यापही कोणत्याही प्रकारचा पुरावा किंवा चिठ्ठी सापडलेली नाही.

 

नाईट ड्यूटीवर असलेल्या सुरक्षारक्षकाने बुधवारी (५ ऑगस्ट) रात्री त्याचा मृतदेह पाहिला आणि रहिवाशांना याबाबत माहिती दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. समीर शर्माने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तसेच, सध्या राहत असलेलं घर त्याने फेब्रुवारी महिन्यात भाड्याने घेतलं होतं, असंही पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुढच्या ३-४ दिवसांत आकडा वेगाने वाढेल पण परिस्थिती नियंत्रणात असेल !

News Desk

Bhandara Hospital Fire | आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा ! प्रकाश आंबेडकरांची मागणी

News Desk

शंकररावजी चव्हाण गुरूरत्न पुरस्कार जाहिर

News Desk