HW News Marathi
Covid-19

पतंजलीच्या ‘कोरोनील’मुळे रामदेव बाबांसह अन्य ४ जणांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई | पतंजलीकडून कोरोनील या औषधाचा केला जाणारा प्रचार पूर्णपणे दिशाभूल करणारा असल्याचा आरोप करत आता जयपूरमध्ये पतंजलीचे सीईओ आचार्य बालकृष्ण, रामदेव बाबा आणि अन्य चौघांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे, कोरोनामुक्त होण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरत असल्याचा दावा करणाऱ्या योगगुरू रामदेव बाबा यांच्या ‘पतंजली’ने आणलेल्या ‘कोरोनील’ या औषधामुळे गेल्या अनेक दिवसांपासून मोठा वाद निर्माण झाला आहे. जयपूरच्या ज्योति नगर पोलीस ठाण्यात हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हा एफआयआर बलराम जाखर यांनी नोंदवला आहे.

“पतंजलीचे ‘कोरोनील’ या औषध कोरोना रुग्णावर १००% लागू होते. कोरोनील या औषधामुळे रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त होईल”, असा दावा पतंजलीकडून करण्यात आला. रामदेव बाबा यांनी हरिद्वार येथे मंगळवारी (२३ जून) कोरोनील हे औषध लॉन्च केले. मात्र, पतंजलीच्या याच दाव्यानंतर या मुद्द्यावरून गेल्या अनेक दिवसांपासून वाद निर्माण झाला आहे. केंद्राच्या आयुष्य मंत्रालयाकडून पतंजलीच्या या औषधाची जाहिरात तातडीने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोनील या औषधाची आवश्यक ती तपासणी होईपर्यंत पतंजलीने या औषधाची जाहिरात थांबवावी असे आयुष्य मंत्रालयाकडून स्पष्ट सांगण्यात आले.

कोरोनील या औषधावरून झालेल्या वादानंतर आता यावर स्पष्टीकरण देताना पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण असे म्हणाले कि, “आम्ही कोरोनील या औषधाच्या वैद्यकीय चाचणीपूर्वी कधीही या औषधाला वैद्यकीयरित्या आणि कायदेशीररित्या कोरोनाचे औषध म्हटले नाही.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात गेल्या २४ तासांत २२ हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची वाढ

News Desk

HW Exclusive | MPSC च्या विद्यार्थ्यांना घरी पोहोचवण्यासाठी प्रयत्न करू !

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पुणे दौरा करण्याची शक्यता!

News Desk