देहरादून | दिल्लीहून देहरादूनला जाणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेसच्या डब्याला (बोगी) आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही घटना काही काळापूर्वी येथील कांसरो स्थानकाजवळ घडली आहे. कांसरो स्टेशन राजाजी व्याघ्र प्रकल्पातील कोर एरियामध्ये आहे. याविषयी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हा डबा रेल्वेपासून वेगळा करण्यात आला आहे. या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
या घटनेमुळे राजाजी व्याघ्र प्रकल्प आणि रेल्वेमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, कांसरो रेंजमधील रेंजर आणि त्यांचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत, तसेच त्यांनी बचावकार्य सुरू केले आहे. आगीच्या ज्वालांनी वेढलेली बोगी रेल्वेपासून वेगळी करण्यात आली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या आगीत शताब्दी एक्स्प्रेसचं C4 compartment जळून खाक झालं आहे. दरम्यान, सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी दिली आहे.
शताब्दी एक्स्प्रेसचा कोच क्रमांक १९९४०० मध्ये हरिद्वार-देहरादून परिरासत आग लागली होती. मिळालेल्या माहितीनुसार इंजिनापासून ८ व्या क्रमांकाच्या डब्यात ही आग लागली होती. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले असून अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळवले आहे. तसेच सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.
A fire broke out in the C4 compartment of the Delhi-Dehradun Shatabdi Express today, due to a short circuit. The incident happened near Kansro. All passengers were safely evacuated, no injuries reported: Uttarakhand DGP Ashok Kumar pic.twitter.com/iTIwSkxCWS
— ANI (@ANI) March 13, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.