HW News Marathi
देश / विदेश

फ्रान्समधील ८५० वर्ष जुने ‘नोट्रे-डेम कॅथेड्रल’ चर्च आगीत जळून खाक

पॅरिस | जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या नोट्रे-डेम कॅथेड्रल या चर्चा भीषण आग लागलीची घटना घडली आहे. १२ व्या शतकात हा चर्च बांधण्यात आला असून हा चर्च ८५० वर्ष जना आहे. या चर्चला युनेस्कोने १९९१ मध्ये या चर्चला जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान दिले होते. या आगीत चर्चा आकर्षक उंच मनोरा देखील जळून खाक झाला आहे. या चर्चचे नूतनीकरण सुरू होते. त्यामुळेच ही आग लागली असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. या आगीमुळे चर्चचे छत पूर्णतः कोसळले आहे. गेल्या वर्षी हेच चर्च वाचवण्यासाठी लोकांना आर्थिक मदतीचे आवाहनही करण्यात आले होते.

इस्टरची तयारी सुरू असताना नोट्रे-डेम कॅथेड्रल चर्चच्या छताला सोमवारी (१५ एप्रिल) आग लागली होती. त्यानंतर हळूहळू आग वाढत गेली. त्यामुळे चर्च परिसरात धुराचे लोटच्या लोट पसरले होते. त्यानंतर ४०० अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी रात्रभर आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आणि यानंतर आज (१६ एप्रिल)आग आटोक्यात यश आले. या आगीच्या घटनेनंतर फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅन्यूअल मॅक्रॉन यांनी नोट्रे-डेम कॅथेड्रलची पुनर्बांधणी करणार असल्याचे म्हटले आहे.

या आगीमुळे चर्चचे नुकसान झाल्याबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले आहे.पॅरिस अग्निशमन दलाचे प्रमुख जीन क्लॉड गॅलेट यांनी म्हटले आहे की, चर्चला लागलेली आग आटोक्यात आण्यात यश आले आहे. या आगीतून चर्चच्या मुख्य इमारतीला वाचविण्यात यश आले आहे. या चर्चला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. फ्रेंच सर्माट नेपोलिअन बोनापार्टचा राज्याभिषेक याच चर्चमध्ये झाला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सचिन पायलट यांची राजस्थानच्या उपमुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी !

News Desk

अलिगढ विमानतळाचं नाव बदलणार? योगी आदित्यनाथ म्हणाले…..

News Desk

सुपरस्टार रजनीकांतचा राजकारणाला रामराम!

News Desk