नवी दिल्ली | दिल्लीतील राणी झांशी रोडवरील अनाज मंडी परिसरातील एका तीन मजली बेकरीच्या इमारतीला आज (८ डिसेंबर) पहाटे ५.३० च्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २७ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. या भीषण दुर्घटनेत तब्बल ४३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ५० हुन अधिक जणांना सुखरूप वाचवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. त्याचप्रमाणे या दुर्घटनेतील जखमींना आरएमएल, एलएनजेपी, हिंदू राव आणि सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते. दरम्यान, आता अग्निशमन दलाच्या जवानांकडून या आगीवर नियंत्रण देखील मिळवण्यात आले आहे.
#Delhi: 32 people dead in fire incident at Rani Jhansi Road, says Delhi Police pic.twitter.com/bSFKc98btO
— ANI (@ANI) December 8, 2019
#Delhi: A team of National Disaster Response Force (NDRF) arrives at the incident spot. 43 people have lost their lives in the fire incident. https://t.co/jmmh95PvpM pic.twitter.com/SeG3g618E8
— ANI (@ANI) December 8, 2019
दिल्लीतील अनाज मंडी परिसरातील एका तीन मजली बेकरीच्या इमारतीच्या एका मजल्यावर ही आग लागली आणि मोठ्या प्रमाणावर संपूर्ण इमारतीत पसरत गेली. आजूबाजूच्या परिसरात ही आग मोठ्या प्रमाणावर पसरल्याने अनेकजण या धुरात गुदमरल्याची माहिती मिळत आहे. या भागात अत्यंत अरुंद गल्ल्या असल्याने आणि हा भाग प्रचंड गर्दीचा असल्याने अग्निशमन दलाला बचावकार्यात मोठे अडथळे आल्याचे समजते. त्याचप्रमाणे, अग्निशमन दलाला या दुर्घटनेबाबत अर्धवट माहिती देण्यात आल्याचे देखील म्हटले जात आहे. केवळ आग लागल्याचे सांगण्यात आले. मात्र लोक अडकून पडल्याची माहिती देण्यात आली नाही, असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.