नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या पर्वाचा प्रारंभ झाला आहे. मोदींनी आज (३१ मे) मंत्रिमंडळाचे वाट झाल्यानंतर पहिली कॅबिनेट मंत्र्यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत मोदी सरकार कडून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय संरक्षण निधी अंतर्गत असलेल्या पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेत बदल करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली. यानुसार शहीद जवानांच्या मुलांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती रकमेत वाढ करण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
Prime Minister Narendra Modi has approved the following changes: Rates of scholarship have been increased from Rs. 2000 per month to Rs. 2500 per month for boys and from Rs. 2250 per month to Rs. 3000 per month for girls. (1/2) https://t.co/hEXo2n8z0z
— ANI (@ANI) May 31, 2019
यामुळे शहीद जवानांच्या मुलाला प्रतिमहिना २ हजार ऐवजी २ हजार ५०० रुपये शिष्यवृत्ती मिळेल. तर मुलींना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीत २,२५० रुपयांवरून ३ हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या शिष्यवृत्ती योजनेचा विस्तार करण्याचा निर्णयही कॅबिनेट मंत्र्यांनी घेतला. दहशतवादी अथवा नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या राज्य पोलिसांच्या मुलांनाही शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
Our Government’s first decision dedicated to those who protect India!
Major changes approved in PM’s Scholarship Scheme under the National Defence Fund including enhanced scholarships for wards of police personnel martyred in terror or Maoist attacks. https://t.co/Vm90BD77hm pic.twitter.com/iXhFNlBCIc
— Narendra Modi (@narendramodi) May 31, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या कॅबिनेट मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांची माहिती ट्वीट करत दिली आहे. मोदींनी शिष्यवृत्ती योजनेच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. मोदींनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले की, “आमच्या सरकारचा पहिला निर्णय देशाचे संरक्षण करणाऱ्यांसाठी समर्पित आहे.”
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.