HW Marathi
देश / विदेश

५ न्यायमूर्तीचे खंडपीठ करणार अयोध्या प्रकरणाची सुनावणी

नवी दिल्ली | अयोध्यातील जागेच्या वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या ५ सदस्यीय घटनापीठ(खंडपीठ) ची आज (८ जानेवारी) नेमणूक करण्यात आली आहे. या घटनापीठासमोर १० जानेवारीला अयोध्या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. या घटनापीठात सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यासह न्यायमूर्ती एस. ए. बोबडे, न्यायमूर्ती एन. व्ही. रामाणा, न्यायमूर्ती यू. यू. ललित आणि न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांचा समावेश आहे.

अयोध्येतील जागेच्या वादाप्रकरणी २०१० मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने सुनावलेल्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिकांविरोधात नव्या पीठाकडून सुनावणी होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने ४ जानेवारीला म्हटले होते. ‘हे राम जन्मभूमीचे प्रकरण आहे. या प्रकरणी नव्या पीठाचे गठन होणार असल्याने आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली. ही सुनावणी १० जानेवारी रोजी होणार आहे,’ असे सरन्यायाधीश रंजन गोगोईंनी त्यावेळी म्हटले होते.

या वादग्रस्त जमीन रामलल्ला, निर्मोही आखाडा आणि सुन्नी वक्फ बोर्ड अशा तीन पक्षकारांमध्ये विभागण्यात यावी, असा निर्णय न्यायालयाने दिला होता. या निर्णयाविरोधात १४ याचिका दाखल झाल्या होत्या. या प्रकरणाची सुनावणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात घटनापीठाकडून करण्यात येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने २९ ऑक्टोबरला स्पष्ट केले होते.

काय आहे घटनापीठ?

संविधानाच्या अनुच्छेद १४५ (३) अंतर्गत, संविधानाच्या व्याख्येशी संबंधित कायद्याच्या, कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नासंदर्भातील प्रकरणाच्या सुनावणीसाठी कमीत कमी पाच न्यायाधीशांचे खंडपीठ असावे लागते, अशाच एका खंडपीठाला घटनापीठ म्हणतात.

Related posts

इंधनाची टाकी धावपट्टीवर कोसळल्याने आग, गोवा विमानतळ दोन तासांसाठी बंद

News Desk

‘टाईम’च्या मुखपृष्ठावर पंतप्रधान मोदींचा वादग्रस्त उल्लेख

News Desk

अमृतसर रेल्वे अपघातासाठी नागरिकच जबाबदार, सीसीआरएसचा अहवाल

News Desk