नवी दिल्ली | पाकिस्तानने त्यांच्या विमानतळांवरील स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय विमानांची वाहतूक तातडीने बंद केली आहेत. पाकिस्तानमधील लाहोर, मुलतान, फैसलाबाद, सियालकोट आणि इस्लामाबाद ही विमानतळे तातडीने बंद करण्यात आल्याची माहिती, एएननाय या वृत्तसंस्थेने दिली आहे. भारताच्या हवाई हद्दीमध्ये पाकिस्तानी लढाऊ विमान शिरल्याची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
Pakistan immediately stops its domestic and international flight operations from Lahore, Multan, Faisalabad, Sialkot and Islamabad airports. pic.twitter.com/nP3rHJr0Ky
— ANI (@ANI) February 27, 2019
भारताच्या हवाई हद्दीमध्ये पाकिस्तानी लढाऊ विमान शिरल्याच्या पार्श्वभूमीवर भारतातील लेह, जम्मू, पठाणकोट, श्रीनगर, चंदिगढ, अमृतसर ही विमानतळे बंद करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. आता भारताप्रमाणेच पाकिस्तानने देखील त्यांची लाहोर, मुलतान, फैसलाबाद, सियालकोट आणि इस्लामाबाद ही विमानतळे बंद केली असल्याची माहिती एएननाय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
Airports in Leh, Jammu, Srinagar and Pathankot in high alert. Airspace suspended due to security reason. Many commercial flights on hold. pic.twitter.com/p7T3nw9ObN
— ANI (@ANI) February 27, 2019
नौशेरा सेक्ट्रमधील राजौरी येथे पाकिस्तानी विमानाने घुसखोरी केली आहे. पाकिस्तानकडून हवाई हद्दीचे उल्लंघन करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी भारतीय हद्दीत शिरून पुंछ, राजौरी भागात बॉम्ब टाकल्याचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.