HW Marathi
देश / विदेश राजकारण

#JantaCurfew : टाळ्या वाजवून लोकांना मदत मिळणार नाही, राहुल गांधींची पंतप्रधानांवर टीका

नवी दिल्ली | कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातला आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव देशात वेगाने वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (२२ मार्च) जनता कर्फ्यूला सुरुवात  झाली असून या कर्फ्यूला जनतेकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या कर्फ्यूदरम्यान जनतेने घरातून बाहेर जाणे टाळा, घरात राहा, असे आवाहन मोदींनी केले आहे. मात्र, र्स, डॉक्टर, पोलीस, ड्रायव्हर, मीडिया यासारख्या अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींच्या कर्तृव्य बजावल्याबद्दल आज सायंकाळी ५ वाजता जनतेने आपआपल्या घरातून बाहेर येऊन थाळ्या, टाळ्या आणि घंटा वाजवून त्यांचे आभार व्यक्त करायचे आहे, असेही मोदींनी गुरुवारी (१८ मार्च) देशाला संबोधित करताना केले.

दरम्यान, मोदींच्या जनता कर्फ्यूवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राहुल गांधींनी ट्वीटमध्ये लिहिले की, “कोरोना व्हायरस हा आपल्या नाजूक अर्थव्यवस्थेवर मोठा आघात आहेकोरोना व्हायरसमुळे देशातील छोटे-मध्यमवर्गीय व्यापारी, मजूरांना मोठा फटका बसला आहे. टाळ्या वाजवून लोकांना काहीही मदत मिळणार नाही, त्यांना आज आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. त्यासाठी सरकारने थेट आर्थिक मदत, कर सवलत आणि कर्जफेडीला स्थगिती अशा विविध मार्गाने तत्काळ यांना मदत करायला हवी,” त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

मोनो आणि मेट्रो रेल्वे सेवा पूर्णपणे बंद

जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मोनो आणि मेट्रो रेल्वे सेवाही आज पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. तर देशातील सर्व पॅसेंजर ट्रेन कालरात्री (२१ मार्च) रात्री ११ वाजेपासून बंद करण्यात आल्या आहेत. मेल, एक्सप्रेस आणि इंटरसिटी पहाटे ४ वाजल्यापासून बंद ठेवण्यात आल्या आहेत. या गाड्या आज रात्री १० वाजेपर्यंत बंद असणार आहेत.

 

Related posts

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला पर्यटकांची पसंती

News Desk

#AirStrike : भारतीय वायू दलाच्या कारवाईला परराष्ट्र मंत्रालयाचा दुजोरा

News Desk

सवर्ण आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आज राज्यसभेत मांडणार

News Desk