HW News Marathi
देश / विदेश

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित पंचत्वात विलीन

नवी दिल्ली | दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांच्यारव शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दीक्षित यांच्या पार्थिवार निगमबोध घाटावर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आला आहे. दीक्षित यांना शेवटचा निरोप देण्यासाठी सर्वसामान्य दिल्लीकरांनी मोठी गर्दी पाहायला मिळाली. दीक्षित यांच्या निधनानंतर सरकारतर्फे आणि दिल्लीमध्ये दोन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

शीला दीक्षित यांचे पार्थिव आज (२१ जुलै) काँग्रेस मुख्‍यालयात अंतिम दर्शनासाठी ठेवण्‍यात आले. त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासठी काँग्रेस नेत्‍या सोनिया गांधी, प्रियांका गांधी यांच्‍यासोबत काँग्रेस आणि भाजपसह अन्‍या नेत्‍यांनी दीक्षित यांनाश्रद्धांजली वाहिली. दीक्षित यांना शनिवारी (२० जुलै) सकाळी दिल्लीच्या एस्कॉर्टस रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने यांचे निधन झाले आहे.

दीक्षित यांनी सलग तीन वेळा दिल्लीचे मुख्यमंत्रीपद भूषविले आहे. शीला दीक्षित या सर्वाधिक काळ दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी राहिल्या आहेत. १९९८ सालापासून २०१३ पर्यंत म्हणजेच तब्बल १५ वर्षे शीला दीक्षित या दिल्लीच्या कार्यभार सांभाळला. तर सध्या त्यांच्याकडे दिल्ली काँग्रेसची संपूर्ण जबाबदारी होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोणीतरी काढा दिल्यानेच तुमचा आवाज विरोधात ! शिवसेनेची संभाजीराजेंवर टीका

News Desk

जेईई ॲडव्हान्सड परीक्षेची तारीख जाहीर!

News Desk

आता देशाच्या सीमांचे संरक्षण करण्यास लष्कराला इस्रोची मदत

News Desk