पणजी | माजी राज्यसभा सदस्य आणि माजी गोवा काँग्रेसचे प्रमुख शांताराम नाईक यांचे शनिवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. नाईक यांना सकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने त्याना मडगाव या त्यांच्या घराजवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
Former Goa Congress Chief and Rajya Sabha MP Shantaram Naik passed away in a hospital in Margao on Saturday
Read @ANI Story | https://t.co/Zq0zfXDdKu pic.twitter.com/4mlsrwvcXL
— ANI Digital (@ani_digital) June 9, 2018
७३ वर्षीय शांताराम नाईक यांच्या अशा जाण्याने आम्हाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या रुपाने आम्ही एक मार्गदर्शक गमवला आहे. नाईक यांनी अनेक युवकांना काँग्रेसमध्ये येण्यासाठी अमुल्य असे मार्गदर्शक केले होते. नाईक यांच्या जाण्याने गोवा काँग्रेसचे मोठ नुकसान झाले असल्याचे गोवा काँग्रेस नेता गिरीश राया यांनी सांगितले.
- शांताराम यांचा अल्प परिचय
शांताराम नाईक यांनी गोवा काँग्रेस पार्टीच्या वतीने १९८४ मध्ये पहिल्यांदा लोकसभा सदस्य म्हणून निवडून आले. नाईक यांनी गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याची मागणी उचलून धरली होती. नाईक यांच्या पाठपुराव्याने गोव्याला १९८७ वेगळ्या राज्याचा दर्जा मिळाला. २००५-२०११ आणि २०११-२०१७ या कालावधीत नाईक दोन वेळा राज्यसभा सदस्य देखील झाले आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.