कोलकाता | लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चटर्जी यांची तब्येत अधिकच खालावली आहे. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. 10 ऑगस्ट रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, मध्यरात्री त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे.
सोमनाथ चटर्जी यांना गेल्या अनेक दिवसांपासून मुत्रपिंडाचा त्रास सुरू आहे. त्यामुळे डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीची काळजी घेत आहे. यापूर्वी 28 जून रोजी कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात त्यांना भरती करण्यात आले होते. मात्र, प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती. सोमनाथ चटर्जी यांनी सीपीएम पक्षातून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. सन 1968 ते 2008 पर्यंत त्यांनी पक्षाचे कार्यकर्ता ते नेता म्हणून सक्रियपणे कामकाज पाहिले. तर 1971 मध्ये पहिल्यांदा ते खासदार बनून संसदेत पोहोचले होते. तब्बल 10 वेळा ते खासदार राहिले आहेत.
दरम्यान, सन 2008 साली भारत-अमेरिका परमाणू करार विधेयकावेळी सीपीएमने तत्कालीन डॉ. मनमोहनसिंग सरकारचे समर्थन काढून घेतले होते. त्यावेळी, सोमनाथ चटर्जी लोकसभा अध्यक्ष होते. यावेळी पक्षाने त्यांना अध्यक्षपद सोडण्याची सूचना केली होती. मात्र, त्यांनी नकार दिला. त्यामुळे सीपीएमने त्यांच्यावर कारवाई करत पक्षातून त्यांची हकालपट्टी केली होती.
Kolkata: Former Lok Sabha Speaker Somnath Chatterjee's condition is critical and he is on ventilator support. Chatterjee was re admitted to hospital on August 10 following kidney ailments. (file pic) pic.twitter.com/mebDd7C5UL
— ANI (@ANI) August 12, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.