HW News Marathi
Covid-19

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी कोरोना पॉझिटिव्ह

नवी दिल्ली । संपूर्ण जगाला सध्या कोरोनाचा घट्ट विळखा आहे. त्यातच आतापर्यंत जगभरातील अनेक नेते-मंडळी, कलाकार आणि खेळाडूंना कोरोनाची बाधा झाल्याचे वृत्त समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे. स्वतः शाहिद आफ्रिदीने ट्विटरच्या माध्यमातून याबाबतची माहिती दिली आहे. शाहिद आफ्रिदी आपल्या ट्विटमध्ये असे म्हणतात, “माझी प्रकृती गुरुवारपासूनच अस्वस्थ वाटत होती. मला अंगदुखीचा प्रचंड त्रास होत होता. त्यानंतर मी वैद्यकीय तपासणी केली आणि दुर्दैवाने मी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. आता मला तुमच्या प्रार्थनांची गरज आहे.” शाहिद आफ्रिदीने असे ट्विट करत ही माहिती दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाहिद आफ्रिदी फाऊंडेशनच्या माध्यमातून त्याने पाकिस्तानातील अनेक भागांमध्ये गरजूंना अन्नधान्य वाटपापासून अनेक प्रकराची मदत केल्याचे दिसून आले आहे. या काळात शाहिद आफ्रिदी पाकिस्तानमधील लोकांसाठी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून मदतकार्य करताना दिसून आला आहे. या काळातच अर्थातच अनेकांशी आलेल्या संपर्कामुळे त्याला कोरोनाची बाधा झाल्याचे म्हटले जात आहे. काहीच दिवसांपूर्वी पाकिस्तानचा माजी सलामीवीर तौफीक उमर यालाही कोरोना झाला होता. मात्र, त्यावर यशस्वीपणे मात करून उमर कोरोनामुक्त झाल्याची माहिती मिळते. त्यानंतर, आता आफ्रिदीला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त येत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धनंजय मुंडे यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

News Desk

महाराष्ट्रात ४५ वर्षांवरील लोकांना कोरोना लस द्या, ठाकरे सरकारची केंद्राकडे मागणी

News Desk

मोदींच्या ‘या’ निर्णयामुळे महाविकास आघाडीचे तोंड बंद झाले, आठवलेंचा टोला

News Desk