HW News Marathi
Covid-19

‘मातोश्री’वर आज धडकणार मराठा समाजाचा मशाल मोर्चा, मेटेंच्या मुख्यमंत्र्यांकडे ‘या’ ९ मागण्या 

मुंबई | राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. याच पार्श्वभूमीवर, आज (७ नोव्हेंबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खाजगी निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’वर मराठा समाजाचा मशाल मोर्चा धडकणार आहे. दरम्यान, यावेळी आंदोलन हे बांद्रा कलेक्टर कार्यालयाच्या समोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानात जमणार असून यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या मोर्चापूर्वी शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले आहे. आपल्या या पत्रात मेटेंनी मुख्यमंत्र्यांकडे एकूण ९ मागण्या केल्या आहेत. विनायक मेटेंच्या या मागण्या नेमक्या काय आहेत ? जाणून घेऊया.

मशाल मोर्चापूर्वी विनायक मेटेंनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या ‘या’ ९ मागण्या

१. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी घटनापीठ स्थापन करण्यासाठी युद्ध पातळींवर प्रयत्न करा.

२. SEBC आरक्षण जो पर्यंत मिळत नाही तो पर्यंत मराठा समाजाला सवलती द्या.

३. वयाच्या आणि इतर अटी आणि शर्ती शिथिलकरा.

४. मेडिकलच्या प्रवेश प्रक्रियेत मराठा मुलांना स्थान द्या.

५. ११ वी आणि इतक तांत्रिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा.

६. २०१४ ची ESBC आणि २०१८-१९-२० च्या SEBC मधील मराठा तरूणांची नोकरभरती पूर्ण करा.

७. हिंगनघाट,रायगड येथील पिडीत कुटुंबीयांनाच न्याय मिळवून द्या.

८. कोपर्डी घटनेतील आरोपींना फासावर लटकवण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे आणि पिडीत कुटुंबीयांना न्याय मिळवून द्या.

९. मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हा सरसकट मागे घ्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण

News Desk

जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात कलम १४४ लागू; अफवा, जातीय द्वेष पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई

Aprna

मोदी सरकारने मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी काही प्रमाणात लोकल ट्रेन सुरू कराव्या

News Desk