HW News Marathi
देश / विदेश

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची तब्येत आणखी खालावली

नवी दिल्ली | देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती आणखी खालावली असल्याचे माहिती आर्मी रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. प्रणव मुखर्जी यांच्या फुफ्फुसापर्यंत संक्रमण पोहोचल्याने त्यांची तब्येत आणखी खराब झाली आहे. मेंदूवर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती आणखी खालावत चालली आहे.

आपली करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे त्यांनी स्वतःच ट्विट केले होते. त्यामुळे त्यांच्यावर कोरोनाचे उपचार देखील सुरुच होते. मुखर्जी यांच्या मेंदूमध्ये एक गाठ होती. त्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे, प्रणव मुखर्जी हे २०१२ ते २०१७ या कालावधीत भारताचे राष्ट्रपती होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दावोस येथील परिषदेत ब्रिटीश कंपनीशी सकारात्मक चर्चा

Adil

जी 20’ मध्ये मोदी-शी चर्चा होणार नाही: चीन

News Desk

संविधान सन्मान यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला मुंबईतून सुरुवात…

News Desk