मुंबई | समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांचे निधन झाले आहे. मुलायम सिंह यादव यांनी आज (10 ऑक्टोबर) सकाळी 815 वाजत्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुलायम सिंह यादव यांनी वयाच्या 82 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.
मुलायम सिंह यादव यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून गंभीर होती. मुलायम सिंह यादव यांच्यावर दिल्लीमधील गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मुलायम सिंह यादव यांना युरिन इन्फेक्शनचा त्रास होता. आणि त्यांची ऑक्सिजन पातळी देखील कमी झाल्याने त्यांना मेदांता रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते.
Samajwadi Party supremo and former Uttar Pradesh CM Mulayam Singh Yadav passes away at the age of 82, confirms Akhilesh Yadav.
He was under treatment at Gurugram's Medanta hospital since last week. pic.twitter.com/qDYIuT5DcH
— ANI (@ANI) October 10, 2022
मुलायम सिंह यांचा अल्प परिचय
उत्तर प्रदेशच्या इटावा जिल्ह्यातील सैफई गावात मुलायम सिंह यादव यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1939 रोजी त्यांचा जन्म झाला. मुलायम सिंह यादव यांचा जन्म हा शेतकरी कुटुंबात झाला होता. मुलायम सिंह यादव यांना ‘धरतीपुत्र’ म्हणून प्रसिद्ध होते. मुलायम सिंह यादव यांनी 4 ऑक्टोबर 1992 रोजी त्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली असून ते तीन वेळा उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री राहिले होते.
मुलायम सिंह यादव हे 1989-1991, 1993-1996, 2003-2007 या कालावधीत उत्तर प्रदेशाचे ते मुख्यमंत्री राहिले होते. मुलायम सिंह यादव यांना एच. डी. देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल पंतप्रधान असताना मुलायम सिंह यादव यांनी संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.