नवी दिल्ली | जेएनयूची विद्यार्थी संघाच्या माजी उपाध्यक्षा आणि पिपल्स मुव्हमेंटची पक्षाच्या नेत्या शेहला रशिद काश्मीर प्रकरणी केलेल्या खोट्या आणि वादग्रस्त ट्विटमुळे अचडणीत आल्या आहेत. सरकारने जम्मू-काश्मीर ३७० कलम रद्द केल्यानंतर येथील परिस्थिती अत्यंत वाईट असल्याचा दावा करणारे एकापाठोपाठ असे १० ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये काश्मीरमध्ये लष्कराकडून सर्वसामान्य नागरिकांवर अत्याचार होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Indian Army: Allegations levelled by Shehla Rashid are baseless and rejected. Such unverified & fake news are spread by inimical elements and organisations to incite unsuspecting population. pic.twitter.com/m6CPzSXZmJ
— ANI (@ANI) August 18, 2019
यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयामधील वकील अलख आलोक श्रीवास्तव यांनी खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्याप्रकरणी शेहला अटक करण्याची मागणी केली आहे. शेहला यांनी रविवारी (१८ ऑगस्ट) एका पाठोपाठ ट्विट करून काश्मीरमधील परिस्थिती गंभीर असून येथील नागरिकांना लष्कर आणि पोलीस त्यांना घरात घुसून त्रास देत असल्याचे ट्वीटमधून सांगितले आहे. शेहलाने केलेल सर्व आरोप भारतीय सैन्याने फेटाळून लावले असून ती काश्मीरसंदर्भात खोट्या बातम्या परसवित असल्याचा सैन्याकडून सांगण्यात आले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.