HW News Marathi
देश / विदेश

२०२१ वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण आज, जाणून घ्या कुठे दिसणार हे ग्रहण

मुंबई | कोणतेही ग्रहण धार्मिक आणि खगोलशास्त्रीय दृष्टीकोनातून एक अतिशय महत्वाची घटना मानली जाते. वर्ष 2021 चे पहिले चंद्रग्रहण आज (२६ मे) लागणार आहे. हा दिवस वैशाख महिन्याच्या पौर्णिमेचा दिवस आहे. या दिवशी गौतम बौद्धांता जन्म झाला होता, अशी मान्यता आहे. त्यामुळे या दिवसाला बुद्ध पौर्णिमा देखील म्हटले जाते. चंद्र ग्रहण दुपारी सुरु झाले असून संध्याकाळपर्यंत असणार आहे. या वर्षातील पहिलं खग्रास चंद्रग्रहण आज म्हणजेच वैशाख पौर्णिमेच्या दिवशी 26 मे आले आहे.

यावेळी चंद्र भारतातील दृश्य आकाशात नसल्यामुळे हे ग्रहण भारतात बहुतांश भागात दिसणार नाही. भारतातील अति-पूर्वेकडील राज्यांमध्ये काही प्रमाणात ग्रहण पाहण्यात येऊ शकतं, अशी माहिती खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली आहे.

१- हे चंद्रग्रहण भारतात कुठे दिसेल :

ग्रहणावेळी चंद्र बहुतेक भागांत पूर्व क्षितिजाच्या खाली असेल म्हणून भारतात ते दिसणार नाही. पण, हे ग्रहण काही मिनिटांसाठी बंगाल आणि पूर्व ओदिशामध्ये दिसेल, ज्यात भारताच्या पूर्व राज्यांच्या अरुणाचल प्रदेश, मिझोरम, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, आसाम आणि मेघालय यांचा समावेश असेल.

२- परदेशात कुठे दिसेल :

हे चंद्रग्रहण अमेरिका, उत्तर युरोप, पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया, प्रशांत महासागर आणि हिंद महासागराच्या काही भागात पूर्णपणे दिसून येईल. हे ग्रहण जपान, दक्षिण कोरिया, बांगलादेश, सिंगापूर, बर्मा, फिलिपिन्स आणि उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत दिसून येईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शबरीमला प्रकरणाची सुनावणी लांबणीवर

News Desk

तिरंग्यावर पक्षाचा झेंडा ठेवल्याने विरोधी पक्षाकडून संताप व्यक्त!

News Desk

‘आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना’ अशी वागणूक केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मिळतेय!

News Desk