HW News Marathi
देश / विदेश

पाकिस्तानच्या गोळीबारात चार जवान शहीद, पाच जखमी

श्रीनगर | पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत नियंत्रण रेषेवर गोळीबार केल्यामुळे चार भारतीय जवानांना वीरमरण आले आहे. या गोळीबारात चार जवानांना वीर मरण तर पाच जवान जखमी झाले आहेत. रामगड विभागातल्या चांबिया येथे पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन रात्रीपासून तुफान गोळीबार केला.

जम्मूच्या रामगड विभागातील चमलियाल पोस्टवर पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या या गोळीबारत बीएसएफच्या एका असिस्टंट कमांडेंटला वीरमऱण आले असून मंगळवारी रात्रीपासूनच पाकिस्तानी सैन्य नियंत्रण रेषेपलीकडून गोळीबार करत आहे. पाकिस्तानच्या या गोळीबाराला भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांत पाकिस्तानकडून शस्त्रसंधीच्या उल्लंघनामध्ये वाढ झाली आहे. शनिवारी ही अखनूरमधील परगवाल विभागात पाकिस्तानी रेंजर्सनी गोळीबार केला होता. यात बीएसएफचे दोन जवान शहीद झाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भारत आता ब्लू इकॉनॉमीमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहे – पंतप्रधान

News Desk

देशातील २२ राज्यातील बळीराजा १ जूनपासून संपावर जाणार

News Desk

भारताच्या एअर स्ट्राईकमुळे मोठे नुकसान झाले, जैश-ए-मोदम्मदची कबुली

News Desk
महाराष्ट्र

माजी न्यायमूर्ती अभय ठिपसेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश

swarit

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण आणि खासदार कुमार केतकर यांच्या उपस्थितीत अभय ठिपसे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

अभय ठिपसे यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती, अलाहाबाद उच्च न्यायालयांचे न्यायाधीशपदही भूषवले आहे. ठिपसे यांनी सोहराबुद्दीन इन्काऊंटर प्रकरणावरुनच भाजपवर टीका केली होती. सोहराबुद्दीन चकमक प्रकरणात अनेक अनियमितता आढळल्या आहेत. या खटल्याबाबत प्रश्न उपस्थित करत अनेक बड्या आरोपींना मुक्त केल्याचा आरोप अभय ठिपसे यांनी केला होता. ठिपसे यांनी सलमान खानची हिट अँड रन केस, बेस्ट बेकरी केस, साध्वी प्रज्ञा केस यांसारखी अनेक प्रकरणे न्यायमूर्ती असताना हाताळली आहेत.

Related posts

आदिवासी कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही- प्रविण दरेकर

News Desk

सोमय्या, दरेकरांनी चौकशीला सामोरे जावे; ‘कर नाही तर डर कशाला’?, अतुल लोंढे

Aprna

शरद पवारांच्या पित्ताशयावर यशस्वी लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया,तब्येत स्थिर

News Desk