HW News Marathi
देश / विदेश

राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार खासदारांची नियुक्ती

नवी दिल्ली | राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज राज्यसभेवर चार खासदारांची नियुक्ती केली आहे. राष्ट्रपतीनियुक्ती करत असलेल्या १२ पैकी चार जागा रिकाम्या झाल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रपतींनी राज्यसभेतील सदस्यांची नावे जाहीर केली आहेत.

उत्तर प्रदेशातील सामाजिक कार्यकर्ते राम शकल, शिल्पकार रघुनाथ मोहापात्रा, लेखक राकेश सिन्हा आणि शास्त्रीय नृत्यांगणा सोनल मानसिंह यांना राज्यसभेची खासदारकी जाहीर झाली आहे. हे चारही दिग्गज त्यांच्या क्षेत्रातील योगदान मोठे आहे.

तसेच राज्यसभेतील क्रिकेटकर सचिन तेंडुलकर, सामाजिक कार्यकर्त्या अनू आगा आणि अभिनेत्री रेखा यांचा कार्यकाळ संपला होता. या नियुक्तीमध्ये विशेष म्हणजे चित्रपट आणि खेळाशी निगडीत असलेल्या एकाही दिग्गज व्यक्तीला राज्यसभेवर पाठवले नाही.

सामाजिक कार्यकर्ता राम शकल

जेष्ठ नेते राम शकल यांनी उत्तर प्रदेशात सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी दलित समाजासाठी मोठे काम केले आहे. राम शकल हे ५५ वर्षीय असून गोरखपूर विद्यापीठातून एम. ए.ची पदवी मिळावली आहे.

शिल्पकार राकेश सिन्हा

शिल्पकार रघुनाथ मोहापात्रा हे ओडिसाचे आहेत. मोहापात्रा यांनी जगन्नाथ मंदिरासाठी त्यांनी मोठे काम केले आहे. त्यांना पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. तसेच मोहापात्रा यांनी भव्य मुर्त्या आणि शिल्प बनवून विक्रम प्रस्थापित केला आहे.

लेखक राकेश सिन्हा

स्तंभलेखक राकेश सिन्हा दिल्ली विद्यापीठातून एम. फिल. केले असून ते विद्यापीठात प्राध्यापक आहेत. तर कोटा विद्यापीठातून पीएचडी केली आहे. सिन्हा यांनी विविध पदांवर काम केले आहे.

नृत्यांगणा सोनल मानसिंह

सोनल मानसिंह या देशातील प्रख्यात नृत्यांगणा आहेत. मानसिंह या शास्त्रीय नृत्यात त्या पारंगत आहेत. तसेच २००३मध्ये मानसिंह यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

Related posts

#AyodhyaVerdict : अयोध्या निकालानंतर व्यक्त होणे टाळा, अफवांवर विश्वास ठेऊ नका

News Desk

बदल्यांच्या फाइल्स CBIकडे जाणार!, हायकोर्टने याचिका फेटाळल्याने ठाकरे सरकारची कोंडी

News Desk

उत्तर प्रदेशात १ मे रोजी साजरा होणार महाराष्ट्र दिन

swarit