श्रीनगर | काश्मीरच्या जनतेला स्वातंत्र्य मिळणे ही त्यांची पहिली प्राथमिकता असल्याचे धक्कादायक विधान काँग्रेसचे काश्मीरमधील ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सैफुद्दीन सोझ यांनी केले आहे. काश्मीर दोन्ही देशांशी जोडल्यामुळे त्याला स्वातंत्र्य मिळू शकत नाही. तसेच काश्मीरचे पाकिस्तानमध्ये विलीनीकरण होण्याची काश्मिरी जनतेची इच्छा नसल्याचे देखील सोझ यांनी स्पष्ट केले आहे.
Musharraf said Kashmiris don’t want to merge with Pakistan, their first choice is independence. The statement was true then and remains true now also. I say the same but I know that it is not possible: Saifuddin Soz, Congress pic.twitter.com/pmtWIxhN16
— ANI (@ANI) June 22, 2018
तसेच ‘काश्मीरमधील जनतेला स्वतंत्र काश्मीर हवे आहे,’ अशी भूमिका पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी देखील मांडली होती. मुशर्रफ यांची ही भूमिका बरोबर होती, असे देखील सोझ यांनी म्हटले आहे. सोझ पुढे म्हणाले, माझ्या वक्तव्याचा काँग्रेस पक्षाशी कोणताही संबंध नाही. सैफुद्दीन सोझ हे युपीएच्या काळात मंत्री राहिले असून त्यांनी ‘काश्मीर ग्लिंपसेस ऑफ हिस्ट्री अँन्ड द स्टोरी ऑफ स्ट्रगल’ हे पुस्तक लिहले आहे. हे पुस्तक पुढील आठवड्यात प्रकाशित होणार आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

previous post